Bhuvneshwar Kumar Birthday: टीम इंडियाचा दमदार वेगवान गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार. खरंतर, वेगवान गोलंदाज हे सर्वसाधारणपणे आक्रमक स्वभावाचे मानले जातात पण 33 वर्षीय भुवनेश्वर कुमार याला अपवाद आहे. भुवनेश्वर कुमार हाशांत आणि नम्र खेळाडू मनाला जातो. ना तो मैदानावर जबरदस्त आक्रमकता दाखवताना दिसला ना त्याचे नाव कधी वादात सापडला. भुवनेश्वरच्या चेंडूंचा वेग फारसा नसतो पण स्विंगच्या जादूने त्याने जगातील नामवंत फलंदाजांना पराभूत केलेच पण त्यांच्या विकेट्सही घेतल्या आहेत. आज भुवनेश्वर कुमार त्याचा ३५ व वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमीत्त त्यांनी फिल्मी स्टाईल प्रेमकथा जाणून घेऊयात.
भुवनेश्वर आणि त्याची पत्नी नुपूर नागर यांची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. पण फार कमी चाहत्यांना माहित असेल की भुवीने नुपूरला तीनदा प्रपोज केले होते. या दोघांची स्टोरी थोडी फिल्मी आहे. भुवी आणि नुपूर हे दोघे बालपणीचे मित्र आहेत. दोघांनी 2017 मध्ये मैत्रीचे रुपांतर लग्नात केले. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये नुपूर आणि भुवी आई-वडील झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भुवीने पत्नीला पटवण्यासाठी तीनदा प्रपोज केले होते.
हे ही वाचा: 'हा' भारतीय फलंदाज त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्यावर झाला नाही आऊट!
भुवनेश्वर कुमारने एका यूट्यूब शोच्या मुलाखतीमध्ये त्याची लव्हस्टोरी सांगितली आहे. त्यामध्ये त्याने सांगितले होते की, नुपूर त्यांच्या कॉलनीत राहत होती. मात्र त्यांच्या प्रेमाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती. सगळ्यांना त्याच्या अफेअरबद्दल माहित होती याची भीती वाटत होती. यामुळे दोघेही गुपचूप भेटत असत. त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि जवळीक वाढत गेली. यानंतर दोघांनीही घरच्यांना सांगितले आणि त्यांच्या संमतीने लग्न केले.
हे ही वाचा: 2 तास 41 मिनिटांचा थ्रिलर चित्रपट, एका आत्माने उघड केले स्वतःच्या खुनाचे रहस्य; तुम्ही बघितला हा सिनेमा?
नुपूरने एका शोमध्ये सांगितले होते की, "आम्ही वयाच्या 13 व्या वर्षी पहिल्यांदा भेटलो होतो पण त्यावेळी आम्ही भावा-बहिणीसारखे होतो." भुवनेश्वरने सांगितले की, त्यावेळी मला माहित नव्हते की या सगळ्या गोष्टी काय असतात आणि काय नतसात. पण एकत्र खेळून छान वाटायचं. त्यावेळेस लाइकनेस म्हणजे काय आणि क्रश म्हणजे काय हे माहीत नव्हते पण एकमेकांशी खेळून मला बरे वाटायचे."