Wriddhiman Saha on Wearing Trousers Reverse: रविवारी अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्स ( Gujrat Titans ) विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातने लखनऊवर 56 रन्सने विजय मिळवला. दरम्यान यावेळी सामन्यात एक गमतीशीर घटना घडली. या सामन्यात फिल्डींगला उतरल्यावर गुजरातचा विकेटकीपर वृद्धीमान साहा उलटी पँट घालून मैदानात उतरला होता. त्याची पँट पाहून मैदानात एकच हशा पिकला. दरम्यान उलटी पँट का घातली होती, यावर आता खुद्द साहाने उत्तर दिलं आहे.
228 रन्सचं टारगेट दिल्यानंतर गुजरातचे खेळाडू फिल्डींगसाठी मैदानात उतरले होते. यावेळी सर्वांची नजर वृद्धिमान साहावर गेली आणि अनेकजण हसू लागले. याचवेळी वृद्धिमान मैदान सोडून आत जाताना दिसला तर त्याच्या जागी केएल भरत विकेटकिपींगसाठी आला. याचं कारण म्हणजे, साहा मैदानात उतरताना उलटी पँट घालून आला होता.
दरम्यान आपण उलटी पँट घालून मैदानात का उतरलो याचं उत्तर नंतर साहाने दिलं आहे. साहा म्हणाला की, मी खाणं खात होतो. त्यावेळी फिजीओने मला सांगितलं की, मला औषध लावायचं आहे. ज्यानंतर मला तातडीने पँट बदलावी लागली. यावेळी मी घाईघाईत उलटी पँट घालून मैदानावर उतरलो.
An explosive star
-run opening partnership
Funny changing room incidentWicketkeeper-batters KS Bharat & @Wriddhipops relive it all post @gujarat_titans' remarkable win - By @Moulinparikh
Full Interview #TATAIPL | #GTvLSGhttps://t.co/wCq2vx216a pic.twitter.com/AzH26DOc3k
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2023
उलटी पँट घातल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसला. ज्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं. मात्र हे असं का घडलं, याबाबत साहाने आता स्पष्टीकरण दिलं आहे.
फिल्डींगला उतरताना वृद्धिमान सहा उलटी पँट घालून मैदानात उतरला होता. ही गमतीशीर चूक हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमीच्या लक्षात आली. जेव्हा या दोघांनाही हे समजलं, तेव्हा त्या दोघांनाही ही घटना इतकी गमतीशीर झाली की, हार्दिक आणि शमी स्वतःला हसण्यापासून रोखू शकले नाहीत.
रविवारच्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने टॉस जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. यावेळी गुजरातने लखनऊसाठी ( Lucknow Super Giants ) मोठा स्कोर उभारला. गुजरातने 20 ओव्हर्समध्ये 227 रन्स केले. यावेळी गुजरातकडून वृद्धिमान साहाने ( Wriddhiman Saha ) 81 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. शिवाय गुजरातचा दुसरा ओपनर शुभमन गिलने देखील चांगली खेळी केली.