WPL 2025 : वुमन्स प्रीमियर लीग 2025 चा (WPL 2025) ओपनिंग सामनाच सुपरहिट ठरला. 14 फेब्रुवारी रोजी वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सीजनचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जाएंट्स (RCB VS GG) यांच्यात पार पडला. या सामन्यात दोन्ही इनिंग मिळून तब्बल 400 धावा झाल्या तसेच या सामन्यात WPL च्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेज करण्यात आरसीबीला यश आले. ज्यात त्यांनी गुजरातचा 6 विकेट्स राखून पराभव केला.
इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने 2023 पासून वुमन्स प्रीमियर लीगला (Women Premier League) देखील सुरुवात केली होती. यंदा या लीगचे तिसरे वर्ष असून दरवर्षी याला क्रिकेट चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. यावर्षी देखील स्पर्धेत 5 संघांचा सहभाग आहे. वुमन्स प्रीमियर लीगचा ओपनिंग सामना बडोदरा स्टेडियमवर खेळवला गेला. यावेळी गुजरात संघासमोर गतविजेत्या आरसीबीचे आव्हान होते. सामन्याला सुरुवात झाली तेव्हा आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु गुजरातच्या फलंदाजांनी फटकेबाजी करून आरसीबीच्या गोलंदाजांना घाम फोडला. यात सर्वाधिक धावा बेथ मूनी (56), ऍशलेह गार्डनर (79), डिआंड्रा डॉटिन (25) यांनी केल्या आणि 5 विकेट्स गमावून 201 धावांचा डोंगर उभा केला. जो वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात जास्त स्कोअर होता.
हेही वाचा : RCB ला मोठा धक्का! स्टार खेळाडू टी 20 लीगमधून बाहेर, गेल्यावर्षी जिंकलेली पर्पल कॅप
आरसीबीला विजयासाठी 202 धावांची आवश्यकता असताना आरसीबीच्या फलंदाजांनीही कंबर कसली. मैदानात उभं राहून त्यांनी एलिस पेरीने 57, राघवी बिस्तने 25, रिचा घोषने नाबाद 64 आणि कनिका अहुजाने 30 धावा केल्या. तर स्मृति मंधानाने 9, डॅनियल व्याट-हॉजने 4 धावा केल्या. अशाप्रकारे आरसीबीने विक्रमी रनचेज करत तिसऱ्या सीजनची विजयी सुरुवात केली. 6 विकेट्स राखून आरसीबीने 202 करत विजय मिळवला.
202- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स, वडोदरा, 2025
191- मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, दिल्ली, 2024
189- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स, ब्रेबोर्न, 2023
179- यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, ब्रेबोर्न, 2023
172- मुंबई इंडियंस vs दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू , 2024