WPL 2025 : वुमन्स प्रीमियर लीग 2025 (WPL 2025) ला 14 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जाएंट्स (RCB VS GG) यांच्यात पार पडला असून या सामन्यात आरसीबीने गुजरातचा पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. आरसीबीने गुजरातवर 6 विकेट्सने विजय मिळवून वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर 202 धावा चेस केल्या.परंतु या विजयानंतरही आरसीबीचं टेन्शन वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. आरसीबीची एक स्टार खेळाडू सध्या दुखापरतीने त्रस्त असून ती स्पर्धेतून बाहेर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या हाती येत असलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची स्टार गोलंदाज श्रेयंका पाटील दुखापतीच्या कारणामुळे वुमन्स प्रीमियर लीग 2025 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. श्रेयंका पाटील आरसीबीच्या सर्वात महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक असून सध्या तिला दुखापत झालेली आहे. पहिल्या सामन्यातही श्रेयंका पाटील ही प्लेईंग 11 चा भाग नव्हती. तसेच ती सामन्यादरम्यान डगआउटमध्ये संघासोबत सुद्धा दिसली नव्हती. दरम्यान तिने सोशल मीडियावर देखील एक पोस्ट शेअर केली असून त्यानंतर असं म्हटलं जातं आहे की ती संपूर्ण सीजनमधून बाहेर होऊ शकते.
सोशल मीडियावर आरसीबीच्या एका प्रॅक्टिस सेशनचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात ऑल राउंडर स्नेह राणा ही आरसीबीच्या संघा सोबत दिसून येतेय. असं म्हंटलं जातंय की स्नेह राणाला श्रेयंका पाटीलची रिप्लेसमेंट म्हणून आरसीबीमध्ये सामील करण्यात आलंय. स्नेह राणा ही मागच्यावर्षी गुजरात जाएंट्सचा भाग होती. परंतु ऑस्कनपूर्वी तिला गुजरातने रिलीज केले आणि आरसीबीने तिला ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं.
हेही वाचा : ICC ची मोठी घोषणा, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ होणार मालामाल, उपविजेत्यांनाही मिळणार एवढे कोटी
श्रेयंका पाटीलने मागच्या वर्षी वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये उत्कृष्ट बॉलिंग परफॉर्मन्स दिला होता. तिने संपूर्ण स्पर्धेत 13 विकेट घेतल्या होत्या. यासाठी तिला पर्पल कॅप सुद्धा मिळाली. श्रेयंका पाटीलचा परफॉर्मन्स आरसीबी करता फायनल सामन्यातही अतिशय महत्वाचा ठरला. ती फायनल सामन्यात आरसीबीसाठी मॅच विनर खेळाडू होती. तिने फायनल सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या होत्या, अशातच श्रेयंका पाटील या सीजनमध्ये नसणं हा आरसीबीसाठी मोठा धक्का आहे.