मला CAAविषयी फारशी माहिती नाही- विराट कोहली

CAA बद्दल बोलायचे झाले तर मला याबाबतीत बेजबाबदारपणे वागायचे नाही. 

Updated: Jan 4, 2020, 06:40 PM IST
मला CAAविषयी फारशी माहिती नाही- विराट कोहली title=

गुवाहाटी: नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी (CAA) मला पुरेशी माहिती नाही. त्यामुळे यावर मी काही प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. भारत-श्रीलंका यांच्यात रविवारी होणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कोहली बोलत होता. हा सामना गुवाहाटीमध्ये होणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (NRC)मुद्द्यावरून सध्या ईशान्य भारत पेटला आहे. 

'असदुद्दीन ओवेसींना क्रेनला उलटे टांगून त्यांची दाढी भादरून टाकेन'

या पार्श्वभूमीवर विराट कोहलीला CAA बद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर विराट कोहली म्हणाला की, गुवाहाटीतील वातावरण अगदी सुरक्षित आहे. आम्हाला इथपर्यंत येण्यात कोणतीही अडचण आली नाही. CAA बद्दल बोलायचे झाले तर मला याबाबतीत बेजबाबदारपणे वागायचे नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी संपूर्ण माहिती असल्यानंतरच तुम्ही त्याविषयी मत व्यक्त केले पाहिजे. त्यामुळे माहिती नसलेल्या प्रकरणात मी स्वत:ला गुंतवू इच्छित नाही, असे विराट कोहली याने सांगितले. 

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक उत्पीडनामुळे तेथून पळून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बौद्ध लोकांना भारताचे नागरिकत्व मिळेल. मात्र, यामधून मुस्लिमांना वगळण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. देशातील अनेक विचारवंत, कलाकार आणि नामवंतांनी या कायद्याविरोधी भूमिका घेतली आहे. यावरून देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी गुवाहाटीतील भारत वि. श्रीलंका सामन्यासाठी विशेष सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आलेली आहे.