Tips and Tricks: एक नव्हे, 4 मार्गांनी पुन्हा मिळवता येतात WhatsApp वरील डिलीट केलेले फोटो

Tips and Tricks: व्हॉट्सअपचा वापर आताच्या घडीला जवळपास सगळेच करतात. जगाच्या कोणत्याही टोकावर असणाऱ्या व्यक्तीसोबत याच माध्यमातून अगदी सहज संवाद साधता येतो.   

सायली पाटील | Updated: Feb 12, 2025, 01:03 PM IST
Tips and Tricks: एक नव्हे, 4 मार्गांनी पुन्हा मिळवता येतात WhatsApp वरील डिलीट केलेले फोटो title=
Explained know How to restore deleted WhatsApp photos read these tips and tricks

Tips And Tricks : व्हॉट्सअप (WhatsApp )... सुरुवातीला फक्त मेसेजिंग अॅप अशीच ओळख असणाऱ्या या अॅपच्या माध्यमातून आता Official Conversations सुद्धा करता येतात. जगभरात अनेकांच्याच वापरात असणाऱ्या या अॅपच्या मदतीनं फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट इतकंच काय, तर पैसेसुद्धा पाठवता येतात. बरं इथं तुम्हाला कोणाशी संपर्कात राहायचं आहे, कोणाला टाळायचं आहे इथपर्यंतची मुभाही देण्यात येते. 

अशा या व्हॉट्सअप मध्ये अनेकदा काही अशा ग्रुपमध्ये युजर्सचं नाव जोडलं जातं जिथं ते खरंतर क्वचितच सक्रिय असतात. कित्येकदा अशाच काही ग्रुपमधून किंवा काही चॅटमधून व्हिडीओ म्हणू नका किंवा फोटो आणि विविध प्रकारच्या फाईल म्हणू नका... बऱ्याच माहितीची देवाणघेवाण होते आणि सरतेशेवटी मोबाईल मेमरी निर्धातीत मर्यादा ओलांडून जाते. मेमरीचं Limit Cross झाल्यानंतर बरीच मंडळी फोनच्या फाईलमध्ये Save असणाऱ्या अनेक गोष्टी Delete करतात. पण, अनावधानानं यातून कित्येकहा काही ठेवण्याजोग्या गोष्टीसुद्धा डिलीट केल्या जातात आणि मग धडपड सुरू होते त्या गोष्टी, त्या फाईल्स परत मिळवण्याची. 

कशा परत मिळवायच्या व्हॉट्सअपवरून डिलीट केलेल्या फाईल? 

- व्हॉट्सअपवर ऑटोमॅटिकली Save झालेले फोटो कसे परत मिळवायचे? 

आयफोन असो किंवा अँड्रॉईड फोन. तिथं चॅटमधून फोटो ऑटोमॅटिक पद्धतीनं default सेव्ह होत असतात. त्यामुळं सर्वप्रथम WhatsApp चे डिलीट झालेले फोटो शोधण्यासाठी आधी फोनमधील Photo App तपासा. तुम्ही अँड्रॉईड वापरणारे असाल तर, Google Photos app तुमची मदत करेल. iPhone वापरणाऱ्यांनी Photos ची मदत घ्यावी. 

तुमच्याकडून डिलीट झालेले फोटो इतरांकडून कसे मिळवाल? 

व्हॉट्सअपवरील एखादा फोटो तुम्हाला सापडला नाही, तर तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात किंवा ज्या व्यक्तीशी चॅट करत आहात त्यांना या फोटोसाठी विचारा. कारण, तिथंही वरील नियम लागू होतो. 

WhatsApp backup मधून डिलीट केलेले फोटो कसे मिळवावेत?

Android (Google Drive) आणि iOS (iCloud) वर WhatsApp backup चा पर्याय उपलब्ध आहे. युजर जर, हा बॅकअप ठेवत असतील तर, फोटो मिळवणं अगदी सोपं होईल. तुम्ही याआधी जर बॅकअप घेतला नसेल तर मात्र तुम्हाला फोटो मिळणार नाहीत. 

हेसुद्धा वाचा : एकच मन कितीदा जिंकणार? कोचला भाड्याचं घर रिकामं करण्याची नोटीस मिळताच नेहरानं जे केलंय ते पाहून हेच म्हणाल... 

Android device च्या Phone Storage मधून कसे मिळवावेत फोटो? 

WhatsApp कायमच अँड्रॉईड सिस्टीममध्ये फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करत असतं. त्यामुळं युजरने डिलीट केलेला एखादा फोटो एखाद्या इंटर्नल फोल्डरमध्येही असू शकतो. यासाठी तुम्हाला फोनची इंटर्न मेमली चाळावी लागेल. जिथं WhatsApp- Media आणि त्यानंतर WhatsApp images वर क्लिक करावं.