दिल्ली : भारत श्रीलंकेदरम्यानचा तिसरा कसोटी सामना दिल्लीच्या कोटला मैदानात सुरू आहे.
दिल्लीमध्ये 'स्मॉग'ची समस्या आत्तापर्यंत केवळ नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करत होती. पण भारत श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यावरही त्याचा परिणाम दिसून आला आहे.
'स्मॉग' मुळे त्रास होत असल्याने लंच ब्रेकनंतर अनेक श्रीलंकन खेळाडू मास्क लावून मैदानात उतरले. होते. सातत्याने त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर अखेर भारताने पहिला डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केला आहे.
श्रीलंका रडीचा डाव खेळत असल्याचे म्हणत अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. श्रीलंकन खेळाडूंचे मास्क घालून मैदानात उतरणं हे नाटकी वागणं आहे. श्रीलंकन खेळाडूंनी बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावावं अशी खोचक प्रतिक्रियादेखील दिली आहे.
Shadi me Fufaji aur Match me "Sri Lankan" na ruthe aisa ho hi nahi sakta.#Nautanki pic.twitter.com/BdCbeeIVcE
— Ashish Singh (@Nalla_Aashish) December 3, 2017
Sri Lankan team waiting for Jacqueline Fernandez as their 11th player. pic.twitter.com/O7s14QCgYc
— Nitin Yadav (@yadavnitin0710) December 3, 2017
ICYMI: India were almost forced to declare their innings in bizarre circumstances as Sri Lanka ran out of players healthy enough to fieldhttps://t.co/KvPMetebUP #INDvSL pic.twitter.com/GZ5T0LZgoT
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 3, 2017
कोलकत्यामध्ये भारत श्रीलंका टेस्ट ड्रॉ झाली. त्यानंतर नागपूरची कसोटी सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. तर आता अंतिम आणि तिसरी कसोटी कोटला मैदानामध्ये सुरू आहे. मजबूत स्थितीमध्ये असलेला भारतीय संघ विजयाकडे आगेकूच करत आहे.