बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार Rohit Sharma? KL राहुलने दिलं उत्तर

येत्या 22 डिसेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान चाहत्यांच्या मनात अजूनही एक प्रश्न आहे तो, म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसरा सामना खेळणार का?

Updated: Dec 18, 2022, 08:28 PM IST
बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार Rohit Sharma? KL राहुलने दिलं उत्तर title=

Rohit Sharma Ind Vs Ban: बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (IND vs BAN 1st Test)  टीम इंडियाने 188 रन्सने विजय मिळवला आहे. पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळाल्याने टीम इंडियाच्या (team india) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याच्या आशा अजून पल्लवित आहेत. दोन्ही टीमच्या मध्ये अजून एक टेस्ट सामना बाकी आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान चाहत्यांच्या मनात अजूनही एक प्रश्न आहे तो, म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसरा सामना खेळणार का?

बांगलादेशाविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये अंगठ्याला लागलेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा पहिल्या टेस्ट मधून बाहेर झाला होता. त्यामुळे पहिल्या टेस्ट सामन्यात, के.एल राहुलला नेतृत्व सांभाळावं लागलं होतं. अशातच आता पहिल्या सामन्यानंतर के.एल राहुलने रोहित शर्माच्या फिटनेसबाबतीत मोठं विधान केलं आहे.

पहिल्या टेस्ट सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल म्हणाला, रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मॅनेजमेंटला येत्या 2-3 दिवसांमध्ये माहिती मिळेल. मला अजून त्याच्या फिटनेससंदर्भात काहीही माहिती नाहीये. दुसरा सामना 22 डिसेंबर रोजी 
रंगाणार आहे.

पहिल्या सामन्यात टीमच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या केएल राहुलने टीमच्या कामगिरीचे कौतुक केलंय. सर्वांनी त्यांची त्यांची भूमिका बजावत योग्य काम केल्याचं राहुलने म्हटलं.

टीम इंडियाने दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा (IND vs BAN 1st Test) पराभव करून विजयाने श्रीगणेशा केला आहे. भारतीय टीमने (team india) पहिला टेस्ट सामना 188 रन्सच्या मोठ्या फरकाने जिंकून जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये बलाढ्य टीमला मागे टाकलंय.

टीम इंडियाने 'या' टीमला टाकलं मागे

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत आणि बांगलादेश (IND vs BAN 1st Test ) यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यापूर्वी श्रीलंका संघ तिसऱ्या स्थानावर होता. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताने 55.33 टक्के गुणांसह तिसरे स्थान आला आहे. ज्यामध्ये श्रीलंकेतील 53.33 टक्के मागे राहिले आहेत. ऑस्ट्रेलिया 75% सह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेत 60 टक्के आहेत.