Gautam Gambhir and Rohit Sharma: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यासोबतच टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही बाहेर पडला. यामुळेच आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मानेवर टांगती तलवार आहे. बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यासोबत शनिवारी 2 तासांहून अधिक वेळ मिटिंग घेऊन ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा आढावा घेतला.
बीसीसीआयने ही मिटिंग मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतली. या मिटिंगसाठी रोहित आणि गंभीर यांच्यासह बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव देवजीत सैकिया हेही उपस्थित होते. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "बॉर्डर गावस्कर मालिकेतील कामगिरीवर बरीच चर्चा झाली, काय चूक झाली आणि त्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे यावर चर्चा झाली." मात्र, बीसीसीआयने अद्याप कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही.
हे ही वाचा: "सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 1-3 मालिकेतील या पराभवासोबत भारताने 10 वर्षात प्रथमच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पराभवामुळे टीम इंडिया या वर्षी जूनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही बाहेर पडली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी हे अग्निपरीक्षापेक्षा कमी नाही.
हे ही वाचा: प्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य?
भारताची पुढील मोठी कसोटी मालिका ही जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका आहे. त्या मालिकेसाठी कर्णधार रोहितची निवड होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विराट कोहलीच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थमध्ये शतक झळकावल्यानंतरही कोहलीला 23.75 च्या सरासरीने केवळ 190 धावा करता आल्या. दुसरीकडे, पहिल्या आणि पाचव्या कसोटीत न खेळलेल्या रोहितने पाच डावांत 6.25 च्या सरासरीने 31 धावा केल्या.