जाणून घ्या, केळीच्या सालीवरून पाय निसटण्याचं वैज्ञानिक कारण

केळ्याच्या सालीवरुन पडण्यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या.

Updated: Jan 12, 2025, 04:27 PM IST
जाणून घ्या, केळीच्या सालीवरून पाय निसटण्याचं वैज्ञानिक कारण title=

Why Your Foot Slips on Banana Peel: कित्येकांना आपण केळीच्या सालीवरुन पाय निसटून पडल्याचं पाहिलं असेल, इतकेच नव्हे तर आपण सुद्धा कधीतरी अशा प्रकारे पडलो असणार. केळीच्या सालीवरुन पाय निसटून पडणे ही आपल्यासाठी अगदीच सामान्य बाब आहे. बऱ्याचदा, चित्रपटात किंवा एखाद्या कॉमेडी शो मध्ये केळ्याच्या सालीवरुन पाय निसटून पडल्याच्या मजेशीर घटना दाखवल्या जातात. ही आपल्याला जरी गंमतीशीर आणि सामान्य बाब वाटत असली तरी अशा पद्धतीने पडणे धोक्याचे ठरु शकते. 

मात्र, केळीच्या सालीवरुन नेमका पाय का निसटतो? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. जर तुम्ही यामागचं 'हे' वैज्ञानिक कारण जाणून घेतलं तर तुमच्या मनात हा प्रश्न परत डोके वर काढणार नाही.

केळीच्या सालीवरुन पाय निसटण्याचं कारण

केळीच्या सालीची रचना

केळीच्या सालीवर एक गुळगुळीत आणि निसरडा पदार्थ असतो. याला 'पॉलिसॅकराइड' (Polysaccharide) असं म्हणतात. केळीच्या सालीवरील हा घटकामुळे साल चिकट आणि लवचिक होते. केळीचं साल ज्या ठिकाणी ठेवले जाते, त्या भागावरील घर्षण कमी होते. म्हणूनच, जेव्हा कोणती व्यक्ती केळीच्या सालीवर पाय ठेवते, तेव्हा त्या भागावर घर्षण कमी असल्याने त्या ठिकाणी व्यवस्थित उभी न राहता त्या व्यक्तीचा तिथून पाय निसटतो. 

चालताना घर्षणाची प्रक्रिया

पाय आणि जमिनीदरम्यान पुरेसं घर्षण झाल्याने आपण चालू शकतो. मात्र, केळीचं साल या चालताना निर्माण होणाऱ्या या घर्षणामध्ये व्यत्यय आणते. केळीचं साल पाय आणि जमिनीमध्ये निसरडा थर निर्माण होतो. यामुळे चालताना अचानक केळ्याच्या सालीवर पाय पडल्याने आपले संतुलन बिघडते आणि आपला त्यावरुन आपला पाय निसटून आपण पडतो. 

संशोधनात आले समोर

2001 मध्ये जपानमधील वैज्ञानिकांनी या विषयावर सखोल संशोधन केले. या संशोधनात केळीच्या सालीचं घर्षण गुणांक खूपच कमी असल्याचं समोर आलं. याच कारणामुळे केळीचं साल हे अधिक निसरड्या पदार्थांपैकी एक मानलं जातं. केळीच्या सालीमध्ये निसरडा घटक असल्यामुळे पायांना स्थिरता मिळणे कठीण होते. 

पृष्ठभागानुसार होतो परिणाम

जर केळीच्या साल टाइल्स किंवा मार्बल्स सारख्या कोणत्या चिकट किंवा निसरड्या ठिकाणी असेल, तर तिथून पाय निसटण्याची शक्यता अधिक असते. याउलट जर केळीचं साल कॉंक्रिट किंवा डांबर सारख्या खडबडीत ठिकाणी असेल तर त्या ठिकाणाहून पाय निसटण्याची शक्यता कमी असते. 

हे ही वाचा: लहान मुलांना आवडीने चहा पाजताय? त्या अगोदर नुकसान समजून घ्या

 

केळीच्या सालीवरुन पाय निसटण्यापासून बचावाचे उपाय

  • केळीचं साल रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फेकू नका.
  • केळीच्या सालीला कचराकुंडीतच फेका.
  • रस्त्यावरुन चालताना सावधानता बाळगा.