Bhooth Bangla : बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ॲक्शन स्टार अभिनेता अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. या दोघांची जोडी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली आहे. अशातच आता 'भूत बंगला' चित्रपटाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे.
खरं तर अक्षय कुमारच्या याचित्रपटात एका सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव ऐकून 'भूत बंगला' चित्रपटाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आनंद होईल.
'भूत बंगला' चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा हॉरर चित्रपट देऊन प्रेक्षकांना घाबरवणार आहे. त्याच्या आगामी 'भूत बांगला' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटात एका सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून तब्बू आहे. अभिनेत्रीने शनिवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटातील एन्ट्रीची माहिती दिली. 'भूत बंगला' चित्रपटाच्या क्लॅप बोर्डचा फोटो शेअर करताना तब्बूने लिहिले की, 'आम्ही इथे लॉक आहोत.' तिच्या या कॅप्शनमुळे अभिनेत्रीची चित्रपटातील एन्ट्री पक्की झाली आहे.
याआधी अक्षय कुमार आणि तब्बूने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. हे कलाकार 2000 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' या सुपरहिट चित्रपटामध्ये शेवटचे दिसले होते. आता अक्षय कुमार आणि तब्बूचे चाहते दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
'भूत बंगला' हा चित्रपट 2 एप्रिल 2026 रोजी रिलीज होणार आहे. 'भूत बंगला' व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमार 'स्काई फोर्स', 'जॉली एलएलबी 3', 'हाउसफुल 5', 'वेलकम टू द जंगल', 'हेरा फेरी 3' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटांची चाहते वाट पाहत आहेत.