Torres Company Scam : मुंबईतील Torres Company घोटाळ्यात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान 69 लाखांची रोडक सापडली होती. ही रोकड ज्या व्यक्तीकडे सापडली तो टोरेस कंपनीचा बडा अधिकारी होता. मात्र, या व्यक्तीचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून या घोटाळ्याचा गुंता अधिक वाढला आहे.
हे देखील वाचा...
टोरेस कंपनीचा जनरल मॅनेजर तानिया कासाटोव्हाला विधानसभा निवडणुकीदरम्यान 69 लाखांच्या बेहिशोबी रोकडसह पकडण्यात आलं होत. मुंबईच्या डोंगरी परिसरात तानियाच्या कारमध्ये कॅश सापडली होती. या रोकड संदर्भात समाधानकारक माहिती देऊ न शकल्याने पोलिसांनी आयकर विभागाला याची माहिती दिली होती. मात्र, त्यावर पुढे काय कारवाई झाली? हे मात्र गुलदस्त्यात आहे. 2008 मध्येही 77 लाखांच्या फसवणूक प्रकरणी देखील तानियाला अटक झाली होती. सहार पोलिसांनी तनियाला अटक केली होती.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात शनिवारपर्यंत कंपनीच्या विविध शाखांमधून सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच कंपनीकडून बक्षीस स्वरूपात वाहन स्वीकारणा-या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. टोरेसप्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेत शोधमोहीम राबविण्यात आली. कंपनीने 15 वाहने विकत घेतल्याचे आणि 5 वाहने आरक्षित केल्याचे पुरावे सापडलेत. आरोपींनी दादर येथे टोरेस कंपनीची शाखा सुरू करण्यासाठी प्रति महिना 25 लाख रुपये भाड्याने जागा घेऊन तेथे शो रूम उघडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जागा मालकाकडे चौकशी करीत आहेत. मालकाने केलेला भाडेकरार, रकमेचा व्यवहार आदी तपशिलाची चौकशी केली जात आहे.