Assam Vs Hyderabad Riyan Parag : श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची (India Vs Sri lanka) घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र काही खेळाडू असे देखील आहेत, ज्यांनी आयपीएल (IPL) आणि रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) उत्कृष्ट कामगिरी करून सुद्धा त्यांना संघात स्थान मिळालं नाही आहे.या खेळाडूंमध्ये रियान परागचे (Riyan Parag) देखील नाव येते. मात्र या रियान परागने आता रणजी ट्रॉफीत वादळ आणलं आहे. त्याच्या या खेळीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
रणजी ट्रॉफित आसाम आणि हैदराबाद (Assam Vs Hyderabad) विरूद्ध सामना सुरु आहे. या सामन्यात आसामकडून रियान परागने (Riyan Parag) अवघ्या 28 बॉलमध्ये 78 धावांची तुफानी खेळी केली होती. परागने या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारही मारले. यादरम्यान त्याने 278.57 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. दरम्यान आसामचा खेळाडू रियान परागला श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही, मात्र त्याने रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घातला आहे.
आसाम आणि हैदराबाद (Assam Vs Hyderabad) यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्याचा हा दुसरा दिवस होता. हैदराबादने पहिल्या डावात 208 धावा केल्या होत्या, तर आसामचा संघ पहिल्या डावात 205 धावांत सर्वबाद झाला होता. दुसऱ्या डावातही आसामची अवस्था फार वाईट होती, पण रियान परागने (Riyan Parag) 78 धावांची तुफानी खेळी करत डाव सावरला होता. मात्र तो देखील आऊट झाला आहे. दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आसामला दुसऱ्या डावात 182/6 धावा करता आल्या आहेत. तर हैदराबादकडून रवी तेजा, भगत वर्मा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहेत.
रियान पराग (Riyan Parag) हा आसामचा 21 वर्षीय युवा खेळाडू आहे. रियानने आपल्या आयपीएलमधील कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात त्याने 78 धावांची तुफानी खेळी केली होती. तर बॉलिंगमध्ये 4 विकेट देखील घेतल्या होत्या.
रियान परागने (Riyan Parag) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19 सामन्यांत 1154 धावा केल्या आहेत. यात त्याने 36 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी सुमार आहे.
दरम्यान आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून अनेक स्फोटक खेळी खेळणारा रियान पराग (Riyan Parag) अजूनही टीम इंडियामध्ये पदार्पणाची वाट पाहत आहे. लवकरच त्याला टीम इंडियात संधी मिळेल, अशी क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.