क्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी

खेळामध्ये आरक्षण मागणी करत भारतीय क्रिकेट संघात दलितांना २५ % आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात केली. 

Updated: Jul 1, 2017, 07:33 PM IST
क्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी

नागपूर : खेळामध्ये आरक्षण मागणी करत भारतीय क्रिकेट संघात दलितांना २५ % आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात केली. 

शासकीय नोकरीत आरक्षण असताना आता क्रीडा क्षेत्रात देखील आरक्षणाची मागणी रामदास आठवले यांनी केल्याने नवीन वाद होण्याची शक्यता आहे. 

मागच्या महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानकडून पराभव कसा झाला याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. 

या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करणारा भारत शेवटच्या सामन्यात पराभूत झाल्याने हि मॅच फिक्स असण्याची आशंका देखील त्यांनी व्यक्त केली.