Shaheen Afridi Marriage: सध्या भारतातच नव्हे, तर सर्वत्रच लग्नसराईचा (Wedding Season) माहोल पाहायला मिळत आहे. तिथे पाकिस्तानातही (Pakistan) असंच काहीसं चित्र दिसून येत आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील आघाडीचा खेळाडू आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यानं संघातील माजी खेळाडू (Shahid Afridi) शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी निकाह केला आहे. कराचीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका अतिशय भव्य सोहळ्यामध्ये शाहीननं जीवनाच्या नव्या वळणाची सुरुवात केली. सोशल मीडियावर सध्या या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. (Pakistan Cricket Team Shaheen Afridi got married with Shahid Afridis daughter netizen share comic comments )
शाहीनच्या लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. गुरुवारी रात्रीपासून या लग्नसोहळ्यापूर्वी मेहंदीची सुरुवात झाली होती. ज्यानंतर निकाह आणि रिसेप्शन पार पडलं. यावेळी पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनीही नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली. यामध्ये बाबर आजम, शादाब खान, सरफराज अहमद यांचा समावेश होता.
बाबर आजमनं ट्विटरवर शाहीन आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एक चेहरा असाही दिसला जो पाहून ट्विटवर अनेक कमेंट्सची बरसात झाली. हा चेहरा पाहून अनेकांनाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच आठवले. 'अरेच्चा! पाकिस्तानात योगीजी काय करत होते?' असे प्रश्नही या फोटोवर उपस्थित करण्यात आले.
अर्थात, ते योगीजी नव्हते. पण, चेहऱ्यामध्ये असणारं साधर्म्य पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. थोडक्यात शाहीनच्या लग्नामुळं एक नवा मुद्दाही बराच चर्चेत आला.
May your hearts beat as one, Congratulations dearest @iShaheenAfridi pic.twitter.com/OvJXmWHCVp
— Babar Azam (@babarazam258) February 3, 2023
शाहिद आफ्रिदीच्या जावयाविषयी म्हणजेच शाहीन आफ्रिदीविषयी सांगावं तर, त्यानं क्रिकेटच्या सर्वच फॉर्ममध्ये प्रभावी खेळाचं प्रदर्शन केलं आहे. त्यानं 25 कसोटी सामन्यांमध्ये 99 गडी बाद केले आहेत. 32 एकदिवसीय सामन्यांमद्ये त्यानं 47 आणि टी20 सामन्यांमध्ये 58 गडी बाद केले आहेत. सामना कोणताही असो, पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेण्यासाठी शाहीन ओळखला जातो. हो, पण आता मात्र शाहिद आफ्रिदीच्या मुलीनंच त्याला क्लिनबोल्ड केलंय असं म्हणायला हरकत नाही.