हार्दिक पांड्याच्या खिशात एक रुपयाही नव्हता, 3 वर्षं फक्त...; निता अंबानी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आज त्याला....'

निता अंबानी (Nita Ambani) यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलं आहे. जवळपास दशकभरापूर्वी दोघे मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते.   

शिवराज यादव | Updated: Feb 17, 2025, 05:58 PM IST
हार्दिक पांड्याच्या खिशात एक रुपयाही नव्हता, 3 वर्षं फक्त...; निता अंबानी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आज त्याला....'

मुंबई इंडियन्स संघ पाचवेळा आयपीएल चॅम्पिअन होण्यामागे अनेक कारणं आहेत. संघातील कौशल्यवान खेळाडू यातील सर्वात मोठं कारण आहे. मुंबई संघाने नेहमीच प्रतिभा असणाऱ्या तरुण खेळाडूंवर गुंतवणूक केली आहे, जे नंतर मोठे स्टार झाले. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे यासाठी उत्तम उदाहरण आहेत. फक्त 10 वर्षांच्या आत आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे दोघे संघाचे अविभाज्य घटक झाले आहेत. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह मुंबई संघ कशाप्रकारे तरुण खेळाडूंना शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण, आकार देत असल्याचं उदाहरण आहे. 

मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण निता अंबानी यांनी हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्यासह झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. जवळपास दशकभरापूर्वी मुंबई इंडियन्स संघाच्या कॅम्पमध्ये त्यांची ही भेट झाली होती. हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्स संघातून पदार्पण केलं. त्यानंतर त्याच्या करिअरने वेगळी उंची गाठली आहे. एक अष्टपैलू खेळाडू ते आता मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदापर्यंत त्याचा प्रवास पोहोचला आहे. हार्दिक पांड्याच्या प्रवासाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे. 

"आयपीएलमध्ये आमच्याकडे ठराविक बजेट असतं, ज्यामुळे प्रत्येक संघ फक्त खेळाडूंवर ठराविक रक्कमच खर्च करु शकते. त्यामुळे आम्हाला नवे कौशल्यवान खेळाडू मिळवण्यासाठी नवे मार्ग शोधणं आवश्यक होतं. मला आठवतं, की नवं टॅलेंट शोधण्यासाठी मी प्रत्येक रणजी ट्रॉफी सामन्यात जात होती. माझे सहकारी आणि मी सर्व देशांतर्गत सामने पाहण्यासाठी जात असत. एके दिवशी त्याने दोन सडपातळ आणि उंच मुलांना माझ्याकडे आणलं," असं निता अंबानी यांनी सांगितलं.

"मी त्यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितलं की, पैसे नसल्याने आम्ही गेल्या तीन वर्षांपासून फक्त मॅगी नूडल्स खाल्ले आहेत. मला त्यांच्यात ते स्पिरीट, पॅशन तसंच काहीतरी मोठं करण्याची भूक दिसत होती. ते दोन भाऊ म्हणजे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या होते. 2015 मध्ये मी हार्दिक पांड्याला 10 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजे साडे आठ लाखात विकत घेतलं आणि आज संघाचा कर्णधार आहे," असंही त्या म्हणाल्या. 

पण निता अंबानी यांना हार्दिक पांड्याच्या आधी जसप्रीत बुमराह सापडला होता. 2013 मध्ये जसप्रीत बुमराहने बंगळुरुविरोधातील सामन्यात ए बी डेव्हेलिअर्सचा त्रिफळा उडवला होता. बुमरहाने अनेकदा आपण कधीही मोठे होताना सीझन बॉलने खेळलो नसून, टेनिस बॉलचा वापर करायचो असा खुलासा केला आहे. पण तरीही आज तो जगातील सर्वात उत्तम आणि धोकादायक गोलंदाज आहे. 

"पुढील वर्षी आमच्या स्काऊट्सने एका तरुण खेळाडूला आणलं, ज्याची शारिरीक हालचाल भलतीच होती. त्यांनी या बॉलिंग करताना पाहा असं सांगितलं. आम्ही त्याला पाहिलं तेव्हा तो जणू चेंडूशी बोलत होता. त्यानंतर तर इतिहास घडला. गतवर्षी आम्ही तिलक वर्माला लाँच केलं आणि आता तो भारतीय संघाचा सदस्य आहे. त्यामुळे मला वाटतं मुंबई इंडियन्सला योग्यपणे भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हटलं जातं," असं त्यांनी म्हटलं आहे.