मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी क्रिकेटपटूंना बायो बबलमध्ये राहाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी बायो बबलमध्ये कोरोना घुसला आणि खेळ थांबवण्याची वेळ आली. आयपीएलमध्ये कोरोना घुसला त्यामुळे 4 मे रोजी IPL चे सामने स्थगित करावे लागले होते. त्यानंतर पुन्हा कडक बायो बबलमध्ये दुसऱ्या सत्रात आयपीएलचे सामने खेळवण्यात आले होते.
आता पुन्हा एकदा आयपीएल जवळ येत असताना काही दिग्गज क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे. जोफ्रा आर्चर, स्टीव स्मिथ सारखे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. आता आणखी एका बॉलरने ऑक्शनपूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल स्पर्धेआधी आणि त्या दरम्यान बराच काळ हा खेळाडूंना बायो बबलमध्ये घालवावा लागतो. हेच टाळण्यासाठी हा बॉलरने निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिशेल स्टार्क यंदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.
स्टार्कच्या म्हणण्यानुसार 'सध्या मला ऑस्ट्रेलियासाठी जास्तीत जास्त खेळायचे आहे. मी काही काळासाठी घेतलेला हा निर्णय आहे. मला वैयक्तिकरित्या बायो-बबलमध्ये आणखी 22 आठवडे घालवायचे नाहीत. बायो बबलमध्ये वाचण्यापासून स्टार्कने हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे. यंदा 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. प्रत्येक संघाने 3 खेळाडू रिटेन केले आहेत. 27 मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.