Lakshya Sen In Quaterfinal on Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला अजून एक पदक निश्चित मानलं जातंय. कारण सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. उपउपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेननं नेत्रदीपक शैलीत भारताच्या एचएस प्रणॉयचा पराभव केला. त्यानं प्रणॉयवर 21-12 आणि 21-6 असा विजय मिळवला. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा तिसरा भारतीय ठरलाय. आता लक्ष्यनं 8 वर्षांनंतर मोठी कामगिरी केलीय.
लक्ष्य सेननंबॅडमिंटनमधील अनेक वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबर केली. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरलाय. यापूर्वी 2012 मध्ये पी कश्यप आणि 2016 मध्ये किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यला 12व्या मानांकित चायनीज तैपेईच्या चेन चौ तिएनशी दोनहात करायचा आहे.
लक्ष्य सेनने पहिल्या सेटमध्ये अतिशय आक्रमक खेळ करत चमकदार कामगिरीचं प्रदर्शन केलं. त्याने आपल्याच देशाच्या एचएस प्रणॉयला कोणतीही संधी न देता चांगली सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आघाडी उभारण्यास त्याने लक्ष्य ठेवलं. यावेळी मात्र प्रणय त्याच्या लयीत दिसत नव्हता. लक्ष्य सेनने त्याला गुण घेण्याची एकही संधी दिली नाही. लक्ष्य सेनने पहिला सेट 21-12 असा एकतर्फी जिंकून सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
LAKSHYA SEN HAVE QUALIFIED FOR QUATERFINAL..!!!!
- He is Qualified for Quarterfinal in the Badminton in Paris Olympics, He is just Unstoppable at the moment. pic.twitter.com/AsFLEnhikF
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 1, 2024
दुसऱ्या सेटलाही लक्ष्यची खेळी पाहून प्रणय गांगरला. पहिल्याच सेट पुन्हा पाहतोय असंच जणू वाटत होतं. दुसऱ्या सेटमध्ये त्याला 6 गुणांपेक्षा जास्त वेळ घेता आला नाही. दुसऱ्या सेटमध्ये सेनने प्रणयला चुका करण्यास भाग पाडलं अन् लक्ष्यने नेत्रदीपक शैलीत दुसरा सेटही 21-6 असा सहज जिंकला.
Lakshya Sen won against counterpart HS Prannoy in straight set 21-12 , 21-6 in Men's Singles Quaterfinals of Paris 2024 Olympics
Lakshya has also created history by becoming 2nd Indian in Men's Singles to reach QF
Well Played Boys.....!!! pic.twitter.com/7J9ZoxXkQJ
— The Khel India (@TheKhelIndia) August 1, 2024
लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या पहिल्याच सामन्यात केविन कॉर्डनचा पराभव केलाय. पण ग्वाटेमालाच्या खेळाडूने कोपराच्या दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून माघार घेतल्यामुळे पहिला विजय व्यर्थ गेला. त्यानंतर पुरुष एकेरीच्या एल गटात बेल्जियमच्या ज्युलियन कॅरेजचा पराभव केल्यानंतर गटाच्या सामन्यातच त्याने जोनाथन क्रिस्टीवला धुळ चारली. लक्ष्यने क्रिस्टीचा 21-12 आणि 21-18 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलंय.