VIDEO: कूल कॅप्टन Kane Williamson ला राग अनावर; कोणावर संतापला केन?

संतापलेल्या केनचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Apr 16, 2022, 09:43 AM IST
VIDEO: कूल कॅप्टन Kane Williamson ला राग अनावर; कोणावर संतापला केन? title=

मुंबई : यंदाच्या आयपीलमध्ये खराब सुरुवात करून सनरायझर्स हैदराबादने आता मात्र कमबॅक केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धचा सामना जिंकून विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे. कालच्या सामन्यात केनच्या सेनेने कोलकात्याचा 7 विकेट्सने पराभव केला. मात्र या सामन्यात कूल कॅप्टन केन विलियम्सनचा भयानक अवतार प्रेक्षकांना आणि चाहत्यांना पाहायला मिळला. संतापलेल्या केनचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 176 रन्सचं टार्गेट दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा हैदराबाद टीम मैदानावर उतरली त्यावेळी सुरुवात काही चांगली झाली नाही. यावेळी केन विलियम्सन फलंदाजी करण्यासाठी सेट झाला होता. मात्र सहाव्या ओव्हरला आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर केन क्लिन बोल्ड झाला. यावेळी केन स्वतःवरच संतापला.

केनचा व्हिडीयो पाहण्यासाठी क्लिक करा

रसेलचा बॉल पुल करण्यासाठी विल्यमसन पुढे गेला आणि चेंडू बॅटला लागल्यानंतर तो थेट विकेटमध्ये गेला. बॉलची लांबी थोडी पुढे होती आणि वेगही जास्त होता. ऑफ स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर बॉल आत गेला आणि त्याने केन विल्यमसनची विकेट गेली. स्वतःच्याच खेळीवर केन इतका संतापला की रिएक्शन लपवू शकला नाही. केनची ही रिएक्शन कॅमेरात कैद झाली आहे. 

क्लीन बोल्ड झाल्यानंतर केन विल्यमसन कसा माघारी परतला याचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. विकेट पडल्याचा राग त्याने स्वतःवर काढला आणि नंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. मागील दोन सामन्यांत त्याने आपल्या फलंदाजीत उत्तम सातत्य दाखवलं होतं.