अंबानींची सून राधिका मर्चंटपेक्षा श्रीमंत आहे टेनिसपटू सानिया मिर्झा?

Sania Mirza Net Worth : टेनिसपटू सानिया मिर्झाची नेटवर्थ खरंच अंबानींची सून राधिका मर्चेंटपेक्षा जास्त आहे? 

दिक्षा पाटील | Updated: Jan 17, 2025, 03:47 PM IST
अंबानींची सून राधिका मर्चंटपेक्षा श्रीमंत आहे टेनिसपटू सानिया मिर्झा? title=
(Photo Credit : Social Media)

Sania Mirza Net Worth : सानिया मिर्झा ही लोकप्रिय आणि यशस्वी भारतीय टेनिसपटू आहे. तिचे आजही लाखो चाहते आहेत. तिनं आजवर अनेक सामने खेळले आहेत. सानियाविषयी बोलायचं झालं तर तिचा जन्म मुंबईत 1986 साली झाला. तिनं तिचं शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केलं. हैदराबादच्या सेंट मेरी या कॉलेजमध्ये सानिया मिर्झा ही शिकली आहे. सानियाला चैन्नईच्या MGR Educational and Research Institute University मधून डॉक्टरेटची डिग्री देखील मिळाली आहे. 

सानियाच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर तिनं 2003 ते 2023 या काळात टेनिस या खेळात सिंगल्स आणि डबल्समध्ये सर्वोत्कृष्ट टेनिसपटू म्हणून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली. 2006 मध्ये तिच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी तिला पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय सानिया ही सगळ्यात पहिली खेळाडू आहे जिला इतक्या कमी वयात हा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय सानियाला अर्जुन पुरस्कार, पद्म भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सानियाही विम्बल्डन डबल्स आणि इतर प्रकारांमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. सानिया मिर्झाच्या नेटवर्थविषयी बोलायचं झालं तर तिची नेटवर्थ ही मुकेश अंबानी यांची सून राधिका मर्चेंट पेक्षा जास्त आहे. सानियाची नेटवर्थ ही 120 कोटी आहे. तर सानियाचं खूप लग्झरियस घर आणि मोठं कार कलेक्शन आहे. तिच्या कारच्या कलेक्शनमध्ये BMW 7-Series आहे. या कारची किंमत 1.70 कोटी आहे. सानियाकडे Range Rover Evoque आणि Jaquar XE या गाड्या देखील आहेत. 

हेही वाचा : Saif Ali Khan Health : 'रक्तबंबाळ अवस्थेत तो...', लिलावतीच्या डॉक्टरांचा खुलासा; कधी डिस्चार्ज देणार ते ही सांगितलं

सानिया मिर्झाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेट शोएब मलिकसोबत लग्न केलं. असं म्हटलं जातं की शोएबनं सानिया मिर्झाची फसवणूक केली. सानिया आणि शोएबला एक मुलगा असून त्याचं नाव इजहान आहे. सानिया नेहमीच त्याच्यासोबत फोटो शेअर करताना दिसते. तर गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं. सानिया मिर्झा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.