IPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार रोहित शर्मा? अश्विनने सेट केली हिटमॅनची किंमत

Rohit Sharma Will Play In RCB? : 31 ऑक्टोबर पूर्वी आयपीएल फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या भविष्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. 

पुजा पवार | Updated: Oct 15, 2024, 01:00 PM IST
IPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार रोहित शर्मा? अश्विनने सेट केली हिटमॅनची किंमत  title=
(Photo Credit : Social Media)

IPL Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीग ही जगभरातील सर्वात मोठी टी 20 लीग असून याचा 18 वा सीजन काही महिन्यांमध्ये सुरु होईल. पुढील महिन्यात आयपीएल 2025 मेगा ऑक्शन पार पडणार असून 31 ऑक्टोबर पूर्वी आयपीएल फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या भविष्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून ते हार्दिक पंड्याने सोपवण्यात आलं होतं. 

रोहितला संघात घेण्यासाठी अनेक फ्रेंचायझी उत्सुक : 

आयपीएल 2025 पूर्वी आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलने काही नियम जाहीर केले असून त्यानुसार आयपीएलच्या 10 फ्रेंचायझी त्यांच्या संघातील फक्त 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. काही रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करू इच्छित नाही. तेव्हा रोहित शर्मा हा कदाचित ऑक्शन टेबलवर येऊ शकतो. रोहितला आपल्या संघात घेण्यासाठी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ अधिक उत्सुक आहेत. 

रोहितवर किती बोली लागेल ? 

टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याला एका युट्युब चॅनेलच्या मुलाखतीत विचारण्यात आले की विराट आणि रोहित हे दोघे आयपीएलमध्ये केला टीममध्ये खेळू शकतील का? यावर आर अश्विनने म्हंटले की, रोहितला मेगा ऑक्शनमध्ये आपल्या संघात घ्यायचं असेल तर आरसीबीला त्याच्यासाठी कमीतकमी 20 कोटी रुपये ठेवावे लागतील. 

हेही वाचा : वूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरंच, 2 टीम सेमी फायनलमध्ये, 5 संघांनी गाशा गुंडाळला

 

आरसीबीला हवाय चॅम्पियन कर्णधार : 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ सुरुवातीपासून आयपीएलचा भाग आहे. विराट कोहली सह एबी डिव्हिलियर्स, फाफ डू प्लेसिस या सारख्या दिग्गजांनी आरसीबीचे नेतृत्व केले. पण  आतापर्यंत एकदाही त्यांना आयपीएलचे विजेतेपदं जिंकता आलेले नाही. तर दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तब्बल ५ वेळा ट्रॉफीवर नाव कोरलंय. आरसीबीला आता अशा कर्णधाराची आवश्यकता आहे जो  त्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकवून देईल. तेव्हा रोहित शर्मा ऑक्शन टेबलवर आल्यास त्याला साईन करण्यासाठी आरसीबी फ्रेंचायझी पूर्ण प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.