IPL 2022 : 40 कोटी दिल्यानंतर ही या खेळाडूने सोडली सनरायझर्स हैदराबाद संघाची साथ

करोडो रुपये देऊन ही या क्रिकेटरने सोडला संघ. 

Updated: Dec 1, 2021, 11:12 PM IST
IPL 2022 : 40 कोटी दिल्यानंतर ही या खेळाडूने सोडली सनरायझर्स हैदराबाद संघाची साथ title=

IPL 2022 : आयपीएल 2022 रिटेन्शनमध्ये सर्व संघ आपापल्या महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवण्याची घोषणा करत असतानाच सर्वात धक्कादायक बातमी सनरायझर्स हैदराबादकडून आली आहे. सनरायझर्स हैदराबादने कर्णधार केन विल्यमसनला कायम ठेवलं आहे. याशिवाय त्यांनी उमरान मलिक आणि अब्दुल समद या दोन अनकॅप्ड खेळाडूंनाही संघात कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे सनरायझर्स हैदराबादने राशिद खान, डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या खेळाडूंना सोडले आहे. 

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू मानला जाणारा राशिद खानला (Rashid Khan) संघाने सोडले आहे. रशीद खान गेली पाच वर्षे सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता. पण असे काय झाले की या लेगस्पिनरला संघाने कायम ठेवले नाही. पण राशिद खानच हैदराबादकडून खेळण्यात उत्सूक नसल्याचं समोर आलंय.

इनसाइड स्पोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार राशिद खानने पैशांमुळे सनरायझर्स सोडले नसून खरे कारण काहीतरी वेगळेच आहे.

राशिद खानच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लेगस्पिनरने पैशासाठी संघ सोडलेला नाही. राशिद खान 2017 मध्ये पहिल्यांदा या संघाशी जोडला गेला आणि तेव्हापासून सनरायझर्स हैदराबादने त्याला 40 कोटी रुपये मानधन दिले आहे. राशिद खानचा पगार 9 कोटी रुपये होता आणि त्याला दुसऱ्या क्रमांकावर कायम ठेवले असते तरी त्याचा पगार वाढला असता. 

पण राशिद खानला सनरायझर्स हैदराबादमधून पैशांमुळे नाही तर वातावरण बदलण्यासाठी सोडण्यात आलं आहे. इनसाइड स्पोर्टच्या बातमीनुसार, राशिद खानला एका नव्या संघात, नव्या वातावरणात खेळायचे आहे.