मुंबई : आयपीएलचा २०२० सालासाठीचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकात्यात पार पडला. मार्चचा शेवटचा आठवडा किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पण आयपीएल स्पर्धेला बराच कालावधी बाकी असतानाही चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा फास्ट बॉलर दीपक चहर हा एप्रिल महिन्यापर्यंत बाहेर असेल, असं टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी दीपक चहरला दुखापत झाली होती. त्यामुळे चहरऐवजी नवदीप सैनीची तिसऱ्या वनडेसाठी निवड झाली होती. दुखापतीमुळे दीपक चहर ३ ते ४ महिने मैदानाबाहेर राहिल, असं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं आहे.
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची टी-२० सीरिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माला टी-२० सीरिजसाठी तर मोहम्मद शमीला दोन्ही सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या इंडिया-ए टीमची घोषणाही एमएसके प्रसाद यांनी केली. बंदीनंतर पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ, दुखापतीनंतर पुनरागमन करणारा हार्दिक पांड्या यांना इंडिया-ए मध्ये संधी देण्यात आली आहे.
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह