IND VS ENG ODI : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS Australia) यांच्यातील 5 सामन्यांची टी 20 सिरीज टीम इंडियाने (Team India) 4-1 ने आघाडी घेऊन जिंकली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खाली भारताच्या युवा खेळाडूंनी इंग्लंडला धूळ चारली. टी 20 सीरिजनंतर आता भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची वनडे सीरिज असल्याने यात टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. नागपूर येथे या सीरिजचा पहिला सामना पार पडत असून 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 च्या सुमारास टीम इंडिया नागपूर एअरपोर्टवर पोहोचली.
19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे. वनडे फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे सामने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमध्ये होतील. रविवारी रात्री रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल यांसह इतर खेळाडू नागपूर एअरपोर्टवर पोहोचले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. 6 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सीरिजचा पहिला सामान पार पडणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाल्यावर टीम इंडियाचा वरिष्ठ संघ इंग्लंड विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : दिग्गज क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकी सध्या काय करतात? कोणी अभिनेत्री तर कोणी CA
06 फेब्रुवारी 2025: भारत विरुद्ध इंग्लंड , पहिला वनडे (विदर्भ क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, नागपुर)
09 फेब्रुवारी 2025: भारत विरुद्ध इंग्लंड, दूसरा वनडे (बाराबती स्टेडियम, कटक)
12 फेब्रुवारी 2025: भारत विरुद्ध इंग्लंड, तीसरा वनडे ( नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेला भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार आहे. परंतु जसप्रीत बुमराह हा दुखापतीच्या कारणामुळे या सीरिजमध्ये खेळणार नसून त्याऐवजी हर्षित राणा याचा टीम इंडियात समावेश होईल. यात टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा तर उपकर्णधारपद शुभमन गिलकडे असणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा