स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी 'ही' भांडी आरोग्यासाठी किती घातक ठरातात माहिती आहे का?

या भांड्यांचे कण अन्नामध्ये मिसळतात आणि हे कण शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये साठून राहतात. म्हणून या धातुच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही भंडी कोणती जाणून घ्या.

Updated: Feb 3, 2025, 06:03 PM IST
स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी 'ही' भांडी आरोग्यासाठी किती घातक ठरातात माहिती आहे का? title=

Saide effects of using aluminium utensils: बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये अ‍ॅल्युमिनियमचे भांडी असतातच. भारतातील स्वयंपाकघरात अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. जगभरात 60 ते 65 टक्के लोकं अ‍ॅल्युमिनिअमचा वापर करतात. कारण हा धातू हलका आणि स्वस्त असतो. पण, सध्या आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे, त्यामुळे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अ‍ॅल्युमिनियमचे कण अन्नामध्ये मिसळतात आणि हे कण शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये साठून राहतात. कसे ते जाणून घ्या?

अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर धोकेदायक का आहे?

अ‍ॅल्युमिनियमची भांडी हलकी आणि स्वस्त असल्यामुळे अनेक घरांमध्ये यांचा सर्रास वापर होतो. पण, संशोधनातुन समोर आले आहे की, या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना विषेशत: आंबट पदार्थ जसे की टॉमॅटो, लिंबू, दही हे पदार्थ बनवले तर अ‍ॅल्युमिनियमचे कण अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता जास्त असते. शरीरात अ‍ॅल्युमिनियमची मात्रा जास्त प्रमाणात गेल्यास हाडे कमकुवत होणे, मानसिक समस्यांचे वाढणे आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. एवढेच नाही तर रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होत जाते. दीर्घकाळ अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर केल्यास शरीरात हळूहळू या धातूचे कण साठू लागतात. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

या धोक्यांपासून बचाव कसा करणार?

या समस्यांपासून बचाव करण्यासाठी स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न (लोखंडी भांडी), किंवा मातीच्या भांड्यांचा वापर करणे अधिक सुरक्षित मानले जाते. ही भांडी केवळ सुरक्षित नसून अन्नातील पोषक घटक टिकवून ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हाला अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर करावाच लागला, तर नॉन-स्टिक कोटिंग असलेल्या भांड्यांचा वापर करणे अधिक चांगले ठरेल. कारण यामुळे अ‍ॅल्युमिनियमचे कण अन्नात मिसळत नाहीत. पितळ तांबा चाँदी किंवा या अशा धातु आहेत ज्याचा स्वयंपाक घरात वापर करणे अत्यंत आरोग्यदायी आहे. हेच कारण आहे की पुर्वीची लोक पितळ आणि तांब्याच्या धातुंची भाडी वापरत होते.

हे ही वाचा: आरोग्य आणि चव दोन्हींसाठी आत्ताच जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा जंक फूड खाणे योग्य

प्रत्येक व्यक्तिसाठी आरोग्याला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर टाळणे हे एक छोटं असून पण महत्त्वाचं पाऊल ठरेल. योग्य भांड्यांची निवड करून तुम्ही अनेक गंभीर आरोग्य समस्यांपासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवू शकता.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)