Cleaning Tips : कपडे धुणे हा अनेकांसाठी एक मोठा टास्क असतो. अशात जर कपड्यांवर तेलाचे डाग पडले तर ते डाग हटवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. तेव्हा तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे कपडे न धुता देखील त्याच्यावरील डाग निघून जातील.
कपडे न धुता त्यावरील तेलाचे डाग काढायचे असतील तर यासाठी तुम्ही टॅल्कम पावडर वापरू शकता. डाग हटवण्यासाठी टॅल्कम पावडर सह टूथब्रश, वर्तमानपत्र, प्रेस, डिटॉल इत्यादी साहित्यांची आवश्यकता असते.
सर्वात आधी कपड्यावर ज्या भागी तेल लागलं आहे अशा ठिकाणी टॅल्कम पावडर लावा. मग यावर कोणतंही दुसरं कापड किंवा वर्तमानपत्र ठेवून इस्त्री फिरवा, असं केल्याने टॅल्कम पावडर कपड्यावरील तेल शोषून घेते. मग टूथब्रशच्या मदतीने डाग लागलेला भाग घासा. असं केल्याने कपड्यावरील टॅल्कम पावडर निघून जाईल आणि डाग सुद्धा स्वच्छ होईल.
बऱ्याचदा खिशात ठेवलेला पेन फुटल्यामुळे किंवा लहान मुलं शाळेत पेनासोबत खेळताना शर्टावर शाईचा डाग लागतो. अशावेळी टूथब्रश डेटॉलमध्ये डुबवून डागावर लावा. 2 मिनिटांपर्यंत ब्रशच्या सहाय्याने शाईचा डाग असलेल्या ठिकाणी घासा. डाग फिक्कट होऊ लागला की पुन्हा हीच क्रिया करा, एक ते दोन वेळा असे केल्यास डाग स्वच्छ होतील.
हेही वाचा : आठवड्यातून किती वेळा जंक फूड खावं? आरोग्य आणि चव दोन्हींसाठी आत्ताच जाणून घ्या
व्हिनेगरचा वापर करून तुम्ही कपड्यांवरून तेलाचे चिकट डाग काढू शकता. परंतु यासाठी तुम्हाला काहीवेळ डागाचे कपडे पाण्यात भिजवून ठेवावे लागतील. बेकिंग सोडा वापरून सुद्धा तुम्ही कपड्यांवरून तेलाचे डाग हटवू शकता. तसेच लिंबाचा तुकडा घेऊन तो कपड्यांवर रगडल्याने सुद्धा कपड्यांवरील तेलाचे डाग दूर होऊ शकतात.
(इथं दिलेली एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. कपडे धुताना त्यावरील लिहिलेल्या सूचना वाचा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)