IND vs BAN Odi Series: न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत यंगिस्तानला 1-0 ने पराभव पत्करावा लागल्यानंतर आता टीम इंडिया 3 सामन्यांच्या वनडे आणि 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशमध्ये (India vs bangladesh) पोहोचला आहे. टीम इंडिया रविवारपासून बांगलादेशविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका (IND vs BAN Odi Series) खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमीचे वनडेमध्ये पुनरागमन झालंय. या मालिकेपूर्वी भारताच्या एका दिग्गज खेळाडू मनिंदर सिंह (Maninder Singh) यांनी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
मला वाटतं की रोहित शर्मामध्ये बरंच क्रिकेट शिल्लक आहे. पण जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसे तुमची सजगता मंद होते. विराट कोहलीच्या (Virat Kohli) रूपात त्याच्याकडं एक उदाहरण आहे की जसंजसं तुम्ही मोठे होत जाता, तसंतसं तुम्हाला तुमच्या फिटनेसवर थोडेसं काम करावे लागेल, असं मनिंदर सिंह यांनी म्हटलंय.
ऑस्ट्रेलियातील T20 वर्ल्ड कपवेळी मी पाहिलंय की ही एक चूक होती जिथं त्याला अधिक काम करण्याची गरज आहे. जर रोहितला त्याची कारकीर्द लांबवायची असेल तर त्याला अधिक मेहनत करावी लागेल, असंही मनिंदर सिंह (Maninder Singh On Rohit Sharma) यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - ज्या गोष्टीने Rohit Sharma ओळखला जातो, तीच आता Suryakumar Yadav ला चोरायचीये!
दरम्यान, केएल राहुलसोबत (KL Rahul) बोलण्याची गरज आहे कारण तो झिम्बाब्वे मालिकेपासून एका झोनमध्ये गेलाय. त्यानंतर तो दीर्घ दुखापतीतून परतला होता. त्याला त्याच्या झोनमधून बाहेर पडावं लागेल, कारण तो कोणत्या प्रकारचा क्रिकेटर आहे आणि त्याची पातळी काय आहे हे आपल्याला माहिती आहे, असंही मनिंगर सिंह (Maninder Singh) म्हणतात.