Pakistan Cricket Team: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आता 2023 साली आशिया चषक (Asia Cup) पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेत आशियातील संघ भाग घेतील. मात्र, या आशिया कपमध्ये भारत सहभागी होणार की नाही, यावर अद्याप स्पष्टता नाही. त्याला कारण ठरलं बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांचं विधान. टीम इंडिया क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असं जय शहा म्हणाले होते. त्यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं विधान केलंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर पाकिस्तान पुढील वर्षी भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप (2023 Cricket World Cup) खेळणार नाही, असं रमीझ राजा यांनी म्हटलंय.
आम्ही यावेळेस आक्रमकपणे आमची बाजू मांडणार आहे. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तान (Pakistan Cricket Team) सहभागी झाला नाही तर वर्ल्ड कप कोण पाहणार?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये आम्ही भारताला हरवलं होतं. आशिया कपमध्येही (Asia Cup) आम्ही भारताचा पराभव केला, अशा बिनाकॉलरच्या बढाय्या देखील त्यांनी मारल्या आहेत.
आणखी वाचा - Team India: '...म्हणून रोहितने मला बॉलिंग दिली नाही', व्यंकटेश अय्यरचा मोठा गौप्यस्फोट!
दरम्यान, आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे आणि मी नेहमीच म्हटलंय की आम्हाला पाकिस्तान क्रिकेटची (Pakistan Cricket Team) अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आम्ही चांगले खेळू, असंही ते (Ramiz Raja on BCCI) म्हणाले. पाकिस्तान संघाने बिलियन डॉलर ईकोनॉमी (Billion Dollar Economy Team) संघाचा दोनदा पराभव केला आहे, असं म्हणत त्यांनी पुन्हा गरळ ओकली.