मुंबई : बातमी क्रिकेट विश्वातील. जगात कोरोनाचे संकट असल्याने याचा फटाका क्रिकेटलाही बसला आहे. मात्र, आयपीएल क्रिकेट (IPL Cricket) या अपवाद ठरणार आहे. आयपीएल क्रिकेटला आता नवा प्रायोजक मिळाला आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना आता क्रिकेटचा आश्वाद घेता येणार आहे. IPL 2020 च्या मुख्य प्रायोजक म्हणून Dream 11 असणार आहे. Dream 11 Title Sponsorship च्या प्रायोजकासाठी तब्बल IPL 2020 ला २२२ कोटी रुपये मोजणार आहे.
IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची माळ Dream 11 च्या गळ्यात पडणार आहे । Dream 11 ची IPL 2020 ला स्पॉन्सरशिप, 222 कोटी रुपये मोजणार@ashish_jadhao https://t.co/kpo9phlA1j pic.twitter.com/1N2hdvgN5h
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 18, 2020
IPL 2020 च्या मुख्य प्रायोजक Dream 11 असणार आहे. या स्पर्धेत टाटा सन्स ( Tata Sons) बाय जूस् (Byju’s), Unacademy हे ब्रँडची शर्यतीत होते. मात्र, Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान Dream 11 IPL 2020 ही क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. IPL 2020 च्या मुख्य प्रायोजक Dream 11 असणार आहे, असे वृत्त एएनआयने IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांच्या हवाल्याने दिले आहे.
Dream11 wins IPL 2020 title sponsorship for Rs 222 crores: IPL Chairman Brijesh Patel
— ANI (@ANI) August 18, 2020
IPL आणि चिनी कंपनी विवो (VIVO) हे पाच वर्षांसाठी करारबद्द झाले हो ते. परंतु भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवानांना वीर मरण आले होते. यानंतर चीन-भारत यांच्या तणाव निर्माण झाला. भारताने कठोर पावले उचलत चीनच्या अॅप्स कंपन्यांना जोरदार दणका दिला. तब्बल ५९ अॅप्सवर बंदी घातली. टिकटॉक हे आघाडीच्या अॅपचा यात समावेश आहे. त्यानंतर चीनविरोधात आणखी वातावरण तयार झाल्याने ‘बीसीसीआय’ने VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित केला.
१३ व्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप निविदा मागवताना ‘बीसीसीआय’ने काही महत्वाच्या अटी घातल्या होत्या. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनेच निविदा पाठवावी ही त्यातली महत्वाची अट होती. स्पॉन्सरशिपचे हक्क देताना सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला हक्क मिळणार नाहीत हे ‘बीसीसीआय’ने याआधीच स्पष्ट केले होते. हक्क मिळणाऱ्या कंपनीचा IPL या ब्रँडला कसा फायदा होईल आणि इतर बाबींचा विचार करुन नवीन स्पॉन्सरबद्दल निर्णय घेतला जाईल, असे भारतीय क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले होते.