Ind vs Pak : टी-20 वर्ल्डकपला (T20 World Cup 2022) उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानशी रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात हाय व्होल्टेज सामना पहायला मिळेल. गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढणार का ?, हा प्रश्न आता भारतीयांच्या मनात आहे. अशातच आता भारत आणि पाकिस्तान (ind vs pak) यांच्यात पुन्हा एकदा मैत्रीचं नातं उफाळून आलं आहे. त्याला कारण ठरलं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam Birthday) याचा बर्थडे...
T20 World Cup 2022 च्या आधी सर्व संघाच्या कर्णधारांनी प्रेस कॅन्फरन्स घेतली. त्यावेळी प्रत्येक कर्णधारांनी माध्यमांना उत्तरं दिली. त्यानंतर प्रोग्रॅम ठरला तो बाबर आझमच्या बर्थडेचा... पाकिस्तानच्या (Pakistan Captain) कर्णधाराच्या बर्थडेसाठी सर्व संघाचे कर्णधार स्टाफ रूममध्ये पोहोचले, केक मागवण्यात आला. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खास गेस्ट होता. त्यावेळी रोहितला पाहून बाबर देखील भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळण्यासाठी आलेल्या सर्व संघांच्या कर्णधारांनी एका आवाजात बाबर आझमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाबर आझम 15 ऑक्टोबर रोजी 28 वर्षांचा झाला आहे. मेलबर्नमधील (Melbourne) आपल्या कर्णधाराच्या वाढदिवसाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी कसा पहिल्यांदा पार्टी हॉलमध्ये जाताना दिसतोय आणि त्याच्या मागे रोहित शर्माही पाहुणा म्हणून तिथं पोहोचतो.
Special guests for the birthday of
We invited all the team captains at the @T20WorldCup to celebrate Babar Azam's birthday pic.twitter.com/WZFzYXywsO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2022
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान (ind vs pak) म्हणजे पारंपारिक प्रतिस्पर्धी. अनेकदा भारत आणि पाकिस्तान सामन्यात भांडणं पहायला मिळतात. मात्र, बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा संघ आणि रोहितच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघात कमालीचा समजूतदारपणा दिसतो. अशातच आता येत्या 23 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.