गुरुवारी उपांत्य फेरीतील पराभवानंतर अमन सेहरावतचे वजन 61.5 किलोग्रॅम पर्यंत पोहोचले होते. पुरुषांच्या 57 किलोग्रॅममधील मर्यादेपेक्षा अगदी 4.5 किलोग्रॅम वजन जास्त आहे. पण पुढच्या 10 तासांत त्याने आपल्या भारतीय प्रशिक्षकांसह अथक परिश्रम करून 4.6 किलो वजन कमी केले.
जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया हे दोन वरिष्ठ भारतीय प्रशिक्षक हे कुस्तीच्या 6 मेंबर्सशी संलग्न आहे. यांनी एक 'मिशन' म्हणून ही गोष्ट स्वीकारली. विनेश फोगटसोबत घडलेल्या घटनेनंतर त्यांना आणखी एक धक्का बसू नये म्हणून सर्व ती काळजी घेण्यात आली. विनेश फोगट महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दुसऱ्या दिवसाच्या वजनात 100 ग्रॅमने जास्त वजन असल्याबद्दल तिच्या अपात्रतेविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहे. त्यामुळे 21 वर्षीय अमनने वजनाच्या बाबतीत विशेष काळजी घेतली.
21 वर्षीय अमनने अजिबात वेळ वाया न घालवता 4.5 किलो वजन रातोरात कमी करण्याचा निर्णय घेतला.
अमन सेहरावत हा भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता ठरला आहे. त्याने वयाच्या 21 वर्षे 24 दिवसांत ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले. अमनच्या आधी, पीव्ही सिंधूने 21 वर्षे, एक महिना आणि 14 दिवस वयाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पहिले पदक जिंकले होते. यापूर्वी विनेश फोगटने अंतिम फेरी गाठली होती, मात्र अपात्र घोषित केल्यामुळे तिला आतापर्यंत पदक मिळालेले नाही.