Venus Transit 2023 : शुक्र हा ऐश्वर्य, सौभाग्य, संपत्ती, प्रेम तसंच वैभव यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रात असं सांगण्यात आलं आहे की, ज्यावेळी शुक्र एखाद्याच्या कुंडलीमध्ये मजबूत स्थितीत असतो त्यावेळी सर्व क्षेत्रांमध्ये त्याचे फायदे मिळतात. पण यावेळी काही राशींना शुक्राच्या अशुभ प्रभावांना सामोरं जावं लागतं. लवकरच शुक्र ग्रह गोचर ( Shukra Gochar ) करणार आहे. शुक्र ग्रहाची ही स्थिती खूप महत्त्वपूर्ण असल्याचं मानलं जातंय.
वैदिक पंचागानुसार, शुक्र ग्रह सध्या मिथुन राशीत आहे. मात्र 30 मे रोजी संध्याकाळी 07:51 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 7 जुलैपर्यंत शुक्र ग्रह या राशीत राहणार आहे. या राशी बदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र यामध्ये अशा राशींचा समावेश आहे, ज्यांना काही बाबींमध्ये सतर्क रहावं लागणार आहे.
शुक्र गोचरच्या दरम्यान वृषभ राशीच्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येतोय. वैवाहिक आयुष्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा विरह देखील सहन करावा लागू शकतो. जवळच्या मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात. सर्वात मोठी बाब म्हणजे आर्थिक क्षेत्रातही सावध राहण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात जपून खर्च करावा लागणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल.
शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे या राशीच्या व्यक्तींची आर्थिक गणितं बिघडणार आहेत. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसंच काम करण्याचा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या कामावर होणार आहे. तुम्ही काही आर्थिक गणितं करून ठेवली असतील तर ती बिघडण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे.
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या संक्रमणादरम्यान काळजी घ्यावी लागणार आहे. कुटुंबातील वादविवाद वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी इतरांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. मोठे खर्च अचानक तुमच्यासमोर उभे राहू शकतात. गरज असेल तर खर्च करावा. खर्च करताना कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करावी.
या काळामध्ये या राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या विरोधकांपासून सतर्क रहावं. शुक्र गोचर हे या राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल राहणार नाही. तुम्ही कोणत्या नव्या कामाचा विचार करत असाल तर तो टाळणं फायदेशीर ठरेल. खर्चाच्या बाबातीत नियंत्रण आणावं लागणार आहे. मोठे खर्च करणं शक्यतो टाळावं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)