Food As Per Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्र, अकं गणित शास्त्र, टॅरो कार्ड यातून आपल्याला भविष्यातील अडचणी आणि समस्यावर उपाय सांगितले जातात. भविष्यात येणाऱ्या अडचणीचे संकेत दिले जातात. त्यासोबत यात अभ्यास करणारे तज्ज्ञ आपल्याला यश, प्रगती आणि आर्थिक प्रगतीसाठी उपाय सुचवतात. आयुष्यात आज प्रत्येक जण यश आणि प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत करत असतो. खूप मेहनत करुनही अनेक वेळा प्रगती आणि यश आपल्या दारापर्यंत येऊ परत जात. त्यावेळी आपण त्रस्त होतो. तुमची ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. जया मदन हिने यशाचं गुरुमंत्र दिला आहे. (Astrology in Mararhi)
आपण रोज चपाती खातो, पण ही चपाती तुम्हाला श्रीमंत (Astrological Foods) करु शकतो. चपाती आणि यशाचं काय गणित आहे याबद्दलचा एक व्हिडीओ ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. चपातीचं पीठ मळताना प्रत्येक दिवसानुसार त्यात एक चुटकी वस्तू टाकली तर तुम्ही यशाच शिखर गाठू शकता. ज्योतिषी जया सांगतात की आठवड्याचा प्रत्येक दिवस हा एका ग्रहाशी जोडला गेला आहे. धर्मशास्त्रात जस प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित असतो. तसंच त्याचा संबंध प्रत्येक ग्रहाशीदेखील असतो. (Roti Ke upay Chapati dough will make you rich add these items every day while kneading the dough and see the miracle Astrology in marathi)
सोमवार या दिवसाचा संबंध हा चंद्रदेवाशी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सोमवारी पीठ मळता तेव्हा त्यात पाण्यासोबत थोड दूध मिक्स करावे. यामुळे तुम्हाला भावनिक स्थिरता मिळणार.
मंगळवार हा मंळग ग्रहाशी संबंधित आहे. यादिवशी पीठ मळताना त्यात थोडीशी लाल मिर्ची पावडर त्यात मिक्स करा. यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा प्राप्त होईल.
बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस आहे. तर या दिवशी तुम्ही हिरवी गोष्टी म्हणजे पालक, मेथी, कोंथिबर किंवा मिर्ची मिक्स करु शकता.
गुरुवारचा दिवस म्हणजे गुरुदेवाचा असतो. यादिवशी पीठ मळताना त्यात केसर, बेसन किंवा हळदी मिक्स करा.
शुक्रवार हा दिवस शुक्र ग्रहाशी संबंध असल्याने या दिवशी पीठ मळताना त्यात आयुष्यात सुख समृद्धीसाठी देशी तूप मिक्स करा.
तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी शनिदेवाचा शनिवारी तुम्ही चपातीच पीठ मळताना त्यात दोन तीन थेंब मस्टर्ड ऑयल मिक्स करा.
तुमच्या आयुष्यात आनंद यावा, तुमचं लोकांनी ऐकावं म्हणून रविवारी चपातीच्या पिठात गूळ मिक्स करा. त्यामुळे कुंडलीत सूर्य मजबूत होतो.
अशाप्रकारे तुमच्या रोजच्या जेवणातून तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करुन तुमच्या आयुष्यातील लक वाढवू शकता, असं ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी सांगितलं आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)