मेष - आपण आयुष्यात कोणता गोल ठेवला असेल तर ते तुमच्यासाठी खास असणार आहे. या परिस्थितीवर मात करत आगामी काळात तुम्हाला तो गाठता येणार आहे.
वृषभ - परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतःला प्रेरित करावं लागेल. जे हवं आहे ते गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल.
मिथुन - साधा, सरळ विचार करा आणि निर्णय घ्या. आगामी काळात याचा नक्कीच फायदा होईल.
कर्क - जीवनातील महत्वाच्या टप्प्यांचा विचार करावा लागेल. सगळी ऊर्जा त्यामध्ये संपेल.
सिंह - डोक्यात अनेक विचार सुरू असतील. चिंता करू नका. सध्या काम करायचं नसलं तरी मनोबल खच्ची होऊ देऊ नका.
कन्या - आज कोणतीही माहिती स्वतःकडे लपवून ठेवू नका. फॅमिलीसोबत काही गोष्टी शेअर करा.
तूळ - ताणावाच्या वातावरणात आज मोकळा श्वास घ्याल. खूप दिवसानंतर जुन्या मित्रपरिवाराशी संपर्क साधला जाईल. आजचा दिवस चांगला असेल.
वृश्चिक - कुणा लहान व्यक्तीकडून मदत घेतली तरी चालेल. हीच गोष्ट आजची सर्वात मोठी आणि सुखावणारी असणार आहे,
धनू - नवीन काही तरी करण्याचा विचार नक्की करा. कौटुंबिक काळजी वाटेल त्यामुळे त्यांच्यासोबत राहा.
मकर - लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपली मत त्यांच्यावर लादू नका.
आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ - आपल्या माणसांसोबत वेळ घालवा. जोडीदाराची साथ आगामी काळात महत्वाची ठरणार आहे. एकत्र राहा आणि आनंदी राहा.
मीन - नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न करा. या वेळेचा सदुपयोग करून घ्या. कौटुंबिक काळजी घ्या. ती महत्वाची ठरेल.