अद्भुत! समुद्राखाली सापडली 11 हजार वर्षांपुर्वीची पाषाणयुगातील भिंत

ही रचना प्रागैतिहासिक मानवांनी बांधली होती. दहा हजार ते अकरा हजार वर्षांपूर्वी पाषाणयुगात शिकारींनी या भिंतीचा उपयोग शिकारीसाठी केला असावा असे सांगितले जाते.

| Feb 25, 2024, 11:34 AM IST

Huge Stone Age Structure: ही रचना प्रागैतिहासिक मानवांनी बांधली होती. दहा हजार ते अकरा हजार वर्षांपूर्वी पाषाणयुगात शिकारींनी या भिंतीचा उपयोग शिकारीसाठी केला असावा असे सांगितले जाते.

1/7

अद्भुत! समुद्राखाली सापडली 11 हजार वर्षांपुर्वीची पाषाणयुगातील भिंत

Huge Stone Age structure found under the Baltic Sea Miscellenous World Marathi News

Huge Stone Age Structure: समुद्राच्या खोल तळाशी काय असेल? याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. तुम्हालाही याची आवड असेल तर खास माहिती तुमच्यासाठी. समुद्राखालील संरचनेचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांना अलीकडेच बाल्टिक समुद्राच्या तळाशी एक पाषाणयुगातील मेगास्ट्रक्चर सापडले आहे. 

2/7

तळाशी विखुरलेली खडकाळ स्थळे

Huge Stone Age structure found under the Baltic Sea Miscellenous World Marathi News

जर्मनीच्या कील युनिव्हर्सिटीचे ओशनोग्राफर जेकब गेर्सन यांनी संशोधकांसह हे रहस्य उघड केले आहे. हजारो वर्षांपूर्वी उत्तर युरोपमधून हिमनद्या मागे गेल्यानंतर मागे राहिलेल्या आणि बाल्टिक समुद्राच्या तळाशी विखुरलेल्या खडकाळ स्थळांना इकोसाऊंडरवर पाहण्याची गेर्सन यांना उत्कट इच्छा होती. 

3/7

इको साउंडर्सची मदत

Huge Stone Age structure found under the Baltic Sea Miscellenous World Marathi News

या पार्श्वभूमीवर गेर्सन यांनी 2021 मध्ये शोध सुरू केला. ते उत्तर जर्मनीच्या किनाऱ्यावरील मेक्लेनबर्गच्या खाडीत घेऊन गेले. येथे संशोधकांनी इको साउंडर्सच्या मदतीने समुद्राच्या तळाचा काही भाग मॅप केला. 

4/7

70 फूट खाली दगडी भिंत

Huge Stone Age structure found under the Baltic Sea Miscellenous World Marathi News

यावेळी सुमारे 70 फूट खाली आम्हाला सुमारे अर्धा मैल लांब दगडी भिंत दिसली. ही भिंत पाषाण युगातील होती. हे पृथ्वीवर ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या संरचनेपैकी एक असल्याची माहिती गेर्सन यांनी दिली. 

5/7

1.5 फूट उंचीची भिंत

Huge Stone Age structure found under the Baltic Sea Miscellenous World Marathi News

आता गेर्सनसह विद्यार्थ्यांची नवीन तुकडी घेऊन याठिकाणी पोहोचली. त्यांनी कॅमेरा खाली केला आणि या रहस्यमय दगडी साखळी असल्याचे त्यांना जाणवले. ही भिंत साधारण 1.5 फूट उंचीची आहे.

6/7

शिकारींना भिंतीचा उपयोग

Huge Stone Age structure found under the Baltic Sea Miscellenous World Marathi News

डेटा गोळा केल्यानंतर गेर्सन यांनी निष्कर्ष काढला. ही रचना प्रागैतिहासिक मानवांनी बांधली होती. दहा हजार ते अकरा हजार वर्षांपूर्वी पाषाणयुगात शिकारींनी या भिंतीचा उपयोग शिकारीसाठी केला असावा, असे इतर पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे. 

7/7

नियमित स्थलांतराचा मार्ग

Huge Stone Age structure found under the Baltic Sea Miscellenous World Marathi News

हे प्रागैतिहासिक लोक भटके होते पण त्यांच्याकडे नियमित स्थलांतराचा मार्ग असावा. या भिंतीच्या आधारे वर्षानुवर्षे ते या स्थानावर परतत असावेत असे गेकर्स सांगतात.