झोप लागण्यास 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणं गंभीर आरोग्याचे संकेत, अजिबात करु नका दुर्लक्ष

लवकर झोप लागणे हे गंभीर आरोग्याच्या समस्येचे संकेत असू शकतात. तसेच, झोप लागायला 20 ते 30 मिनिटे लागणे देखील एक समस्या असू शकते. पाहूयात नक्की काय आहे याचे कारण. 

Intern | Feb 27, 2025, 17:37 PM IST
1/6

झोप ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी शरीराला आराम आणि मनाला शांती देते. झोपेच्या वेळी शरीर आणि मेंदूमध्ये अनेक बदल घडतात, जसे की हृदयाची गती कमी होणे, श्वसनाची गती मंदावणे, स्नायूंना आराम मिळतो आणि मेंदूतील विचारांची गती कमी होणे.    

2/6

अनेक लोक आहेत जे अगदी कमी वेळेतच झोपी जातात, तर काही लोकांना झोपण्यासाठी खूप वेळ लागतो. एका अभ्यासानुसार, जर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये झोप येत असेल, तर त्याचा अर्थ गंभीर आरोग्य समस्या असू शकतात. झोप लागायला जास्त वेळ लागणं किंवा कमी वेळ लागणं हे झोपेच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकू शकतात.    

3/6

स्लीप हेल्थ फाउंडेशन 18 ते 64 वर्ष वयातील व्यक्तींना दररोज सात ते नऊ तास झोप घेण्यासाठी सांगते. अनेक लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. कमी झोप घेतल्यास, हृदयरोग, स्ट्रोक, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, नैराश्य, चिंता आणि अल्झायमर यासारख्या गंभीर शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

4/6

तज्ज्ञांचे मत:

तज्ज्ञांच्या मते, 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात झोप लागणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. जर तुम्ही झोप लागण्यासाठी 5 ते 20 मिनिट लागत असतील तर तो योग्य कालावधी मानला जातो. झोपेतून लवकर येणे 'नार्कोलेप्सी' सारख्या आजाराचे लक्षण असू शकते, तर 20 ते 30 मिनिटे लागणे हे निद्रानाशाचे संकेत असू शकते.

5/6

झोपेला अडथळा आणणारी कारणं:

रात्रीचे आवाज, मोबाइल, टीव्ही आणि टॅब्लेटमधून येणारा स्क्रीन लाईट आणि बाहेरील प्रकाश झोपेत अडचणी निर्माण करू शकतात. तसेच, मानसिक ताण, चिंता किंवा नकारात्मक विचार देखील झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात. याशिवाय, ड्रग्जचे व्यसन, धूम्रपान आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे यामुळेही निद्रानाश होऊ शकतो.  

6/6

झोपेच्या समस्येवर उपाय:

जर तुम्हाला नियमित झोप मिळूनही परत झोप येत नसेल, तर झोपेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते तुमच्या झोपेवर होणाऱ्या परिणामांची कारणे ओळखून त्यावर उपचार करू शकतात. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)