200 वर्षांपूर्वी राणीच्या अंघोळीसाठी बांधलेलं हे न्हाणीघर; रहस्यमयीरित्या महालाचे 5 मजले आजही पाण्याखाली
अशक्य.... जमिनीखाली नव्हे, तर पाण्याखाली दफन झालेला हा महाल आहे तरी कुठे? निम्म्या इमारतीला जलसमाधी...
Sayali Patil
| Feb 27, 2025, 14:29 PM IST
भारतामध्ये आजवर अनेक अद्वितीय इमारतींचं बांधकाम झालं. गतकाळातही स्थापत्याचं उत्तम उदाहरण असणाऱ्या कैक वास्तू उभारण्यात आल्या आणि त्या वास्तूंनी कायमच अनेकांचं लक्ष वेधलं.
1/7
भारत

भारत हा एक असा देश आहे, ज्या देशाला एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशात असणारं राजेशाही पर्व हे त्याचच एक उदाहरण असून, कायद्यानं संस्थानं खालसा झाली असली तरीही त्यांना मिळणारा मान, त्यांच्याविषयी वाटणारं कुतूहल आजही कायम असल्याचं पाहायला मिळतं. अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देशामध्ये एक राज्य असंही आहे जिथं आजही कैक वर्षांपूर्वीचे गडकिल्ले भक्कम स्थितीत उभे असून, ते इतिहासाचीच साक्ष देतात.
2/7
कैक रहस्य

कैक रहस्य या इमारतींनी आपल्यात दडवून ठेवली असून, अशाच एका अद्वितीय वास्तूविषयीची माहिती पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधत आहे. ही ऐतिहासिक वास्तू आहे 'जल महल'. जयपूरची शान अशी ओळख असणारी ही महालवजा इमारत जयपुर-आमेर मार्गावर असणाऱ्या मानसागर तलावाच्या मध्यभाहगी असून, कैक रहस्य या इमारतीसह पाण्य़ात शांतपणे स्थिरावली आहेत. अनेक वर्षांपासून पाण्यात उभ्या असणाऱ्या या महालाचं कोणतंही नुकसान झालं नसून, 226 वर्षांपूर्वी नेमका हा महाल कसा बांधण्यात आला हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
3/7
जल महल

4/7
राजे

5/7
तलावात स्नानाचा आनंद

6/7
डोंगर आणि तलाव
