तुम्हालादेखील उपवासानंतर अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो? 'या' खास टिप्स फॉलो करुन आजारांना दुरुनचं राम राम करा

Fast Eating Rules: भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये काल महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू सनातन धर्मात सणासुदीला उपवास आणि नैवेद्याला एक विशेष महत्त्व आहे. पण, अनेकांना उपवासानंतर अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही खास टीप्स फॉलो करू शकता.  

Feb 27, 2025, 15:42 PM IST
1/7

उपवासाच्या दिवशी केलेल्या आहारात आणि दैनंदिन जेवणात खूप फरक असतो. या फरकामुळे उपवासाच्या दिवशी लोकं खूप उत्साही असतात. पण, दुसऱ्या दिवशी भोवळ, मळमळ, गॅस, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या उद्भवतात. म्हणून उपवास सोडताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.  

2/7

उपवासाच्या दिवशी सकाळीच फळे खाऊ नका. उपाशी पोटी फळं खाल्ल्याने गॅस होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय वेफर, चिवडा वगैरे तळलेले पदार्थ खाणे टाळा. सकाळी उकडलेली रताळी खाऊ शकता.  

3/7

उपवासाच्या दिवशी साबूदाण्यापासून बनवलेले जड पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या वाढेल. अशा वेळी जेवण्याच्या अर्ध्या ते पाऊण तासाआधी पाणी प्या, त्याशिवाय दिवसभर जास्त पाणी प्या.  

4/7

उपवासाला साबुदाण्याचे वडे, खिचडी, थालीपीट किंवा वेफर्स असे पदार्थ खाल्ले असतील तर त्यानंतर ताक प्यावा. ताक प्यायल्याने जड पदार्थदेखील सहजरित्या पचतात.  

5/7

तुम्हाला उपवासाच्या दुसऱ्या दिवशी पचनासंबंधी समस्या जाणवत असतील तर उपवास सोडताना कोणतेही तेलकट तुपकट पदार्थ खाऊ नका. उपवास सोडताना नारळ पाणी पिणे फायद्याचे ठरते.  

6/7

उपवास सोडताना दिनचर्येनुसार चहा किंवा कॉफी घेऊ नका, त्याऐवजी उपाशी पोटी कोमट पाण्यात मध घालून प्या.  

7/7

उपवास सोडल्यानंतरदेखील काही बाबींची काळजी घ्या. जसे की, दुपारचे जेवण झाल्यावर दही खा. त्यामुळे पोटदुखी कमी होते तसेच खाल्लेले अन्न नीट पचते.