'छावा' सिनेमात बाल संभाजीराजेंची भूमिका साकारणारा 'तो' कोण? अशी मिळाली भूमिका

छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. त्या निमित्ताने सिनेमातील कलाकारांचीही चांगलीच चर्चा होत आहे. 

Mansi kshirsagar | Feb 27, 2025, 15:21 PM IST

Abhinav Salunkhe Chhaava: छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. त्या निमित्ताने सिनेमातील कलाकारांचीही चांगलीच चर्चा होत आहे. 

1/7

'छावा' सिनेमात बाल संभाजीराजेंची भूमिका साकारणारा 'तो' कोण? अशी मिळाली भूमिका

chhaava child actor abhinav salunkhe how did he get the chhatrapati sambhaji maharaj role

छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या छावा सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात विकी कौशलने साकारलेल्या भूमिकेची चांगलीच पसंती मिळत आहे. मात्र, त्याचबरोबर चित्रपटात दिसणारा 'शंभूबाळ'देखील प्रेक्षकांना आवडले आहेत. 

2/7

 छावा चित्रपटात विकी कौशलसोबतच सर्व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. याचवेळी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात संभाजी महाराजांच्या बालपणीची भूमिका साकारलेल्या बाल कलाकारांचीही चर्चा होतेय. पण हा अभिनेता आहे तरी कोण? वाचा.

3/7

चित्रपटात औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवणारा हा बाल संभाजी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला आहे. या बाल कलाकाराचे नाव अभिनव साळुंखे असं आहे. 

4/7

छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा नजरकैदेत ठेवले असतानाचा संभाजीराजेदेखील त्यांच्यासोबत होते. चित्रपटातील एका सीनमध्ये औरंगजेब भर दरबारात शिवाजी नही आया? असं विचारतो तेव्हाच संभाजीराजेंची एन्ट्री होते.

5/7

औरंगजेबच्या डोळ्यात डोळे खालून बाल संभाजी उत्तर देतात. छत्रपती शिवाजी महाराज. त्यावर औरंगजेब विचारतो आपको बुखार नही आता युवराज? त्यावर बाल संभाजी उत्तर देतात, हमारे वजह से औरोको बुखार आता है, काही मिनिटांचा हा सीन काळजाला भिडणारा आहे. 

6/7

बाल संभाजीराजेंच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्याचे नाव अभिनव साळुंखे असं आहे. तो मुंबईचा असून तो आता सातवीत शिकतोय. अभिनवचे मुळ गाव चिपळूणमधील बोरगावचा आहे.

7/7

अभिनव मल्लखांबचे प्रशिक्षणदेखील घेत आहे. याचमुळं त्याला हा रोल मिळाला आहे. अभिनव जिथं मल्लखांबचं प्रशिक्षण घेतो तिथं छावा चित्रपटाची टीम बालकलाकाराच्या शोधात आली होती. काही मुलांचे ऑडिशनही झाले. त्यानंतर अभिनवची या भूमिकेसाठी निवड झाली.