'तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..'; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासा

Ayushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमान खुरानाने या दोघांच्या नात्यामधील एक कटू आठवण सांगितली आहे. जाणून घेऊयात तो काय म्हणाला आहे.

Swapnil Ghangale | Apr 24, 2024, 15:49 PM IST
1/8

ayushmannkhurranatahirakashyap

अभिनेता आयुषमान खुरानाने नुकत्याच 'मिशाबेल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे.  

2/8

ayushmannkhurranatahirakashyap

आयुषमानने 'रोडिज' हा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर त्याची त्यावेळची गर्लफ्रेण्ड ताहिरा कश्यपबरोबर ब्रेकअर केलं होतं. त्यानेच याबद्दलचा खुलासा केला आहे.

3/8

ayushmannkhurranatahirakashyap

"तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा प्रसिद्धी कशी हाताळायची हे तुम्हाला समजत नसतं," असं आयुषमान म्हणाला.   

4/8

ayushmannkhurranatahirakashyap

"मला आठवतंय की मी त्यावेळी माझ्या गर्लफ्रेण्डबरोबर ब्रेकअप केलं होतं. माझी गर्लफ्रेण्ड सोडून पहिल्यांदाच मला इतर लोकं एवढं महत्त्व देत होते. त्यावेळी माझी बुद्धी चालणं बंद झालं," अशी कबुली आयुषमानने दिली.

5/8

ayushmannkhurranatahirakashyap

"तुम्ही पौंडावस्थेत असता तेव्हा तुम्ही बहरत असता, वेगवेगळ्या गोष्टी पहिल्यांदा अनुभवत असता आणि तुमचं रुपांतर पुरुषात होत असतं, तोच तो काळ होता," असं आयुषमान म्हणाला.  

6/8

ayushmannkhurranatahirakashyap

"त्यावेळी मी चंदीगडमधील सर्वात लोकप्रिय तरुण होतो. म्हणून मी ताहेराबरोबरच ब्रेकअप केलं होतं. मी तिला म्हणाला होतो, 'मला आता फार महत्त्व मिळत आहे. मला आता माझ्या पद्धतीने आयुष्य जायचं आहे," अशी आठवण आयुषमनने सांगितली. 

7/8

ayushmannkhurranatahirakashyap

मात्र सहा महिन्यांमध्ये मी तिच्याकडे परतलो आणि तिला म्हणालो, 'मला तुझ्याशिवाय हा प्रवास शक्य नाही. मी एकटा हे करु शकत नाही,' असंही आयुषमानने सांगितलं.  

8/8

ayushmannkhurranatahirakashyap

2004 साली रोडिजच्या दुसऱ्या पर्वामध्ये आयुषमानने जेतेपदावर नाव कोरलं होतं.