Business Idea: 1.65 लाखांत सुरू करा 'हा'; महिन्याला 60 हजारांपेक्षा अधिक होईल कमाई

Business Idea: तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू आहे का? पण तुम्हाला जास्त गुंतवणुकीची काळजी वाटत असेल, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत जो तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता.  

Surabhi Jagdish | Apr 24, 2024, 12:41 PM IST
1/7

आम्ही ज्या नवीन बिझनेस आयडिया सांगतोय ती आहे केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय.

2/7

केळी पेपर निर्मिती युनिट स्थापन करून तुम्ही बंपर कमाई करू शकता. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) केळी पेपर निर्मिती युनिटचा अहवाल तयार केला आहे.

3/7

केळीचा कागद हा केळीच्या झाडाच्या सालाच्या किंवा केळीच्या सालीच्या तंतूंपासून तयार केला जातो. पारंपारिक कागदाच्या तुलनेत, केळीच्या कागदात कमी घनता, उत्तम डिस्पोजेबिलिटी, हाय टेंसिल स्ट्रेंथ असते.

4/7

KVIC च्या केळी पेपर उत्पादन युनिटवर तयार केलेल्या प्रकल्प अहवालानुसार, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 16 लाख 47 हजार रुपये खर्च आला आहे.

5/7

मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशापेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 1 लाख 65 हजार रुपये गुंतवावे लागतील. बाकी रक्कम फायनान्स करू शकता.

6/7

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, जीएसटी नोंदणी, एमएसएमई उद्योग ऑनलाइन नोंदणी, बीआयएस प्रमाणपत्र, प्रदूषण विभागाकडून एनओसी आवश्यक असणार आहे.

7/7

या व्यवसायातून तुम्ही वार्षिक 5 लाखांपेक्षा जास्त कमवू शकता. पहिल्या वर्षी सुमारे 5 लाख रुपयांचा नफा होईल. दुसऱ्या वर्षी 6 लाख रुपये नफा होण्याची शक्यता आहे.