मुंबई : भारतात सोशल नेटवर्किंगची मुहूर्तमेढ रोवणारी पहिली वहिली सोशल नेटवर्किंग साईट, ऑर्कुट काही दिवसांनी बंद होणार आहे.
या आधी ऑर्कुटवर फोटो रूपयात साठवलेल्या तुमच्या आठवणी नक्की पाहा, आणि ऑर्कुटचं हेच तुम्हाला 'आठवणींचं गिफ्ट' समजा.
तुम्हाला आठवत नसेल, तर तुमच्या जी-मेलचा आयडी आणि आताचाच जी-मेल पासवर्डने orkut.co.in वर लॉगइन केलं, तरी तुमचं ऑर्कुट अकाऊंट ओपन होईल.
ऑर्कुट अकाऊंट ओपन केल्यावर तुमचे जुने फोटो पाहा, तुमचे त्यावेळचे मित्र, आठवणी अजूनही ऑर्कुटवर संग्रहीत आहेत.
ऑर्कुटने काळजीपूर्वक जपून ठेवलेल्या तुमच्या फोटो स्वरूपातल्या आठवणी तुमच्या पीसीवर सेव करा, हवं तर हे फोटो फेसबुकवर शेअर करा आणि पाहा तुमच्या जुन्या मित्रांच्या कशा प्रतिक्रिया येतात.
पुन्हा रूसलेले, दुरावलेले मित्र ऑर्कुट जाता-जाता जवळ आणणार आहे. पुन्हा मुशाफिरी करा आणि पाहा तुम्ही आणि मित्र पाच-सहा वर्षापूर्वी कसे दिसत होते, नक्की मज्जा येईल, नक्की पाहा, लॉगइन करा www.orkut.co.in आणि तुमचं आठवणींचं गिफ्ट मिळवा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.