'आयफोन फोर-एस' झाला स्वस्त

 आयफोन फोर एसची किंमत आता खाली आहे, त्यामुळे तो फोन आता तुमच्यासाठी निश्चितच महागळा राहिलेला नाही, कारण आयफोनच्या किंमतीत ४ ते ५ हजारांनी कपात झाली आहे.

Updated: Jul 14, 2015, 09:52 PM IST
'आयफोन फोर-एस' झाला स्वस्त title=

मुंबई :  आयफोन फोर एसची किंमत आता खाली आहे, त्यामुळे तो फोन आता तुमच्यासाठी निश्चितच महागळा राहिलेला नाही, कारण आयफोनच्या किंमतीत ४ ते ५ हजारांनी कपात झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून भारतात iPhone 4S ची केवळ १३ हजार रुपयांमध्ये विक्री होत आहे. याआधी iPhone 4S ची किंमत १७ हजार ते १८ हजार एवढी होती. मात्र, आता ४ ते ५ हजारांनी कपात करण्यात आली आहे.

iPhone 4S च्या किंमतीत कपात झाल्याने शाओमी, हुआवी, लिनोव्हासारख्या कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बजेट स्मार्टफोन्सना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. कारण इतर स्मार्टफोनच्या तुलनेत भारतीय मोबाईल यूझर्स आयफोनकडे वळण्याची शक्यता आहे.

भारतात अॅपलच्या आयफोनना प्रचंड मागणी आहे. जेव्हा 'आयफोन सिक्स' लॉन्च झाला, त्यावेळी अॅपल स्टोअरबाहेर मोबाईलप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.