इन्फोसिसच्या सीईओंना वर्षांला 30 कोटी रूपये पगार

इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नुकतेच निवडले गेलेले विशाल सिक्का यांना वर्षाला ३०.५ कोटी रुपयांचे पॅकेज देऊ करण्यात आलं आहे. 

Updated: Jul 3, 2014, 09:27 PM IST
इन्फोसिसच्या सीईओंना वर्षांला 30 कोटी रूपये पगार title=

मुंबई : इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नुकतेच निवडले गेलेले विशाल सिक्का यांना वर्षाला ३०.५ कोटी रुपयांचे पॅकेज देऊ करण्यात आलं आहे. 

इन्फोसिसकडून सिक्का यांना प्रतिवर्षी २० लाख डॉलरचे शेअर देण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

विशाल सिक्का यांनी येत्या एक ऑगस्ट रोजी इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच त्याची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली होती. 

डॉलरमध्ये मोजल्यास सिक्का यांना वर्षाला एकूण ७०.८ लाख डॉलर इतके वेतन मिळणार आहे. यामध्ये कंपनीच्या शेअर्सचा समावेश आहे. 

जगातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर दिग्ग्ज कंपन्यांच्या तुलनेत सिक्का यांचे वेतन कमी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.