फेसबुकचे नवे फिचर्स, म्हणा व्हिडिओतून Thanks

 सोशल मीडियावर आघाडीवर असणाऱ्या फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवे फिचर्स  आणले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून Thanks म्हणू शकणार आहात.

Updated: Nov 14, 2014, 10:57 PM IST
फेसबुकचे नवे फिचर्स, म्हणा व्हिडिओतून Thanks title=

मुंबई : सोशल मीडियावर आघाडीवर असणाऱ्या फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवे फिचर्स आणले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून Thanks म्हणू शकणार आहात.

फेसबुकने 'Say Thanks' हे नवं फिचर्स लाँच केले आहे. या फिचर्सद्वारे युझर्सना आपल्या मित्रांसाठी एक व्हिडिओ कार्ड तयार करता येणार आहे. थँक्स फिचर्समध्ये एका थीमनुसार मित्राचे फोटो आणि पोस्ट टाकून व्हिडिओ तयार करता येणार आहे.

तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकता. त्यासाठीच हे नवं व्हिडिओ फिचर्स फेसबुकने आणले आहे. व्हिडिओ तयार करुन आपल्या मित्रांच्या टाइमलाइनवर पोस्ट करता येणार आहे. या फिचर्सचा वापर करण्यासाठी facebook.com/thanks या लिंकवर जाता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.