www.24taa.com, नवी दिल्ली
डिझेल कारवरची एक्सईज ड्यूटी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डींनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जींना पत्र लिहून डिझेल कारवर एक्साईज ड्यूटी वाढवण्याची मागणी केली आहे.
यासाठी एक प्रस्तावही तयार करण्यात आलाय. ज्यामध्ये छोट्या डिझेल कारवर 1 लाख 70 हजार रुपये तर मध्यम आणि मोठ्या गाड्यांवर 2 लाख 55 हजार रुपये वाढीव एक्साईज ड्यूटी लावण्याची मागणी करण्यात आलीय.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खूप फरक असल्याने यावर्षी डीझेलची अंडर रिकव्हरी एक लाख करोडच्यावर होईल. याला प्रतिबंध करण्यासाठी डिझेल कारवर अक्साईज ड्यूटी वाढवावी अशी मागणी जयपाल रेड्डींनी केलीय.