बारा वर्षांच्या मुलानं केली पंधरा वर्षांच्या मुलाची हत्या

दुर्दैवानं लहान वयातच मुलांमधली हिंसक प्रवृत्ती वाढतेय. त्याची दोन धक्कादायक उदाहरणं समोर आलीयत. ठाण्यात अवघ्या बारा वर्षांच्या मुलानं पंधरा वर्षांच्या मुलाचा खून केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2013, 07:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, झी मीडिया, ठाणे
दुर्दैवानं लहान वयातच मुलांमधली हिंसक प्रवृत्ती वाढतेय. त्याची दोन धक्कादायक उदाहरणं समोर आलीयत. ठाण्यात अवघ्या बारा वर्षांच्या मुलानं पंधरा वर्षांच्या मुलाचा खून केलाय.
दीपक यादवच्या वडिलांचं श्राद्ध झाल्यानं त्यानं केस कापून टोपी घातली होती. ती बारा वर्षाच्या मुलानं काढून घेतली. त्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. नंतर मारामारी झाली. यामध्ये दीपक जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे पिंपरीमध्ये एका तेरा वर्षांच्या मुलानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचं उघड झालंय. त्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचून दोन लाखांची खंडणी मागितली होती.
मुलांनी हिंसक होऊ नये, यासाठी लहान मुलांच्या पालकांनी त्यांच्याशी संवाद वाढवावा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.