फेसबुक स्मार्टफोनची फिचर्स लॉन्चिंगपूर्वीच `लिक`

फेसबुकचा आज आपला स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. लॉन्चिंगचा सोहळा कंपनीच्या कॅलिफोर्नियाच्या मुख्यालयामधल्या मेनलो पार्कमध्ये आयोजित करण्यात आलाय. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याची फिचर्स ‘लिक’ करण्यात झालीत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2013, 11:23 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
फेसबुकचा आज आपला स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. लॉन्चिंगचा सोहळा कंपनीच्या कॅलिफोर्नियाच्या मुख्यालयामधल्या मेनलो पार्कमध्ये आयोजित करण्यात आलाय. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याची फिचर्स ‘लिक’ झालीत.
या स्मार्टफोनसाठी सोशल नेटवर्किंग साईट कंपनी फेसबुकनं मोबाईल फोन बनवणाऱ्या एचटीसी या कंपनीसोबत हातमिळवणी केलीय. इवीलीक्सनं केलेल्या दाव्यानुसार फेसबुकच्या या फोनचं नाव ‘एचटीसी फर्स्ट’ असं असेल. या फोनचे फोटो लॉन्चिंगच्या अगोदरच प्रसारीत झालीत.
‘एचटीसी’नं याअगोदरही दोन फेसबुक डेडीकेटेड ‘सालसा’ आणि ‘चा चा’नावानं स्मार्टफोन लॉन्च केलेत. या दोन फोनच्या की-बोर्डमध्ये फेसबुकसाठी स्पेशल बटन निर्माण करण्यात आली होतं. पण, हे दोन्ही फोन बाजारात मात्र फोल ठरले.

फेसबुक स्मार्टफोनचे फिचर्स...
- स्क्रीन : ४.३ इंच
- प्रोसेसर : ड्युअल कोर क्वॉल कम स्नैप ड्रॅगन
- रैम : एक जीबी
- स्टोरेज : १६ जीबी
- कैमरा : ५ मेगा पिक्सल