मुहूर्त ठरला: पुढील महिन्यात सुरेश रैनाचं लग्न!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना वर्ल्डकपनंतर लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश रैनाच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याचं लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत होणार असल्याचं कळतंय.

Updated: Mar 15, 2015, 03:13 PM IST
मुहूर्त ठरला: पुढील महिन्यात सुरेश रैनाचं लग्न! title=

मुंबई: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना वर्ल्डकपनंतर लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश रैनाच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याचं लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत होणार असल्याचं कळतंय. तिचं नाव प्रियंका असून ती नेदरलँडमध्ये नोकरी करते आणि मूळची मेरठची राहणारी आहे. 

रैना टीम इंडियाचा मोस्ट एलिजिबल बॅचलर राहिलाय. आता लवकरच त्याच्या लग्नाचे लाडू खायला मिळणार आहेत. गेल्या वर्षी टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू अजिंक्य रहाणेनं सुद्धा लग्न केलंय.

सुरेश रैनाच्या लग्नाचा मुहूर्त एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातला आहे. कारण नंतर लगेच तो आयपीएलच्या मॅचेसमध्ये व्यस्त होईल. सुत्रांनुसार लग्नासाठी ३ एप्रिलचा मुहूर्त निश्चित केला गेलाय. रैनाच्या आईने फार पूर्वीच मैत्रिणीच्या मुलीसोबत सुरेशचं लग्न ठरवलं होतं. तो लग्नाचा झाला की बोलणी पक्की करू, असं ठरल्याचंही कळतंय.

रैनाच्या घरी सध्या सेलिब्रेशनचं वातावरण आहे. कुटुंबिय रैनाची वर्ल्डकप दौऱ्यावरून परतण्याची वाट पाहत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.