सेहवाग - गावस्करच्या यादीत मुरली विजयचा समावेश

इंग्लंडविरुद्ध वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मुरली विजयने शानदार शतक झळकावलेय. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 8वे शतक आहे.

Updated: Dec 10, 2016, 12:06 PM IST
सेहवाग - गावस्करच्या यादीत मुरली विजयचा समावेश title=

मुंबई : इंग्लंडविरुद्ध वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मुरली विजयने शानदार शतक झळकावलेय. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 8वे शतक आहे.

या शतकासह वानखेडेच्या मैदानावर शतकांचा एक नवा रेकॉर्ड मुरली विजच्या नावावर झालाय. गेल्या 30 वर्षांत सेहवागनंतर वानखेडे मैदानावर शतक झळकाणारा तो दुसरा सलामीवीर फलंदाज ठरलाय.

वीरेंद्र सेहवागने 2002मध्ये म्हणजेच 1986नंतर 16 वर्षानंतर शतक केले होते. त्यानंतर 14 वर्षांनी मुरलीने ही किमया साधलीये. 

या मैदानावर केवळ गावस्कर आणि सेहवागनेच शतक झळकावलेय. आता या यादीत मुरलीच्या नावाचाही समावेश झालाय. मुरली विजयने 45 कसोटीत आतापर्यंत 3हजाराहून अधिक धावा केल्यात.